Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
IND Vs ENG Live: मँचेस्टरमध्ये अभिषेक शर्माचे वादळ; इंग्लंडला विजयासाठी 191 रन्सची गरज

IND Vs ENG Live: मँचेस्टरमध्ये अभिषेक शर्माचे वादळ; इंग्लंडला विजयासाठी 191 रन्सची गरज

  • वैभव सूर्यवंशी 14 रन्स करून झाला
  • श्रेयस अय्यरचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
  • अभिषेक शर्माने केली वादळी 45 रन्सची खेळी
India vs England 2nd T20 Live Updates: सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा टी 20 सामना सुरू आहे.
कानरधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आजचा सामना खास होता. कारण 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने इंटरनॅशनल डेब्यू केले. त्याने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला 191 रन्सचे टार्गेट दिले आहे.

भारताची फलंदाजी
भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या डावयाची सुरुवात अभिषेक शर्मा आणि 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने केली. दोघांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. वैभव सूर्यवंशीने शानदार दोन सिक्स मारले. मात्र दुर्दैवाने तो 14 रन्सची एक लहानशी खेळी करून आउट झाला. मात्र दुसऱ्या बाजूने अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली. तो 45 रन्स करून आउट झाला. त्यानंतर इशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यरने भारताचा डाव सावरला. इशान किशन 49 रन्स करून आउट झाला. शिवम दुबे आणि तिलक वर्माने प्रत्येकी 5 रन्स केल्या. अक्षर पटेल 2 रन्सवर रन आउट झाला.

इंग्लंडची गोलंदाजी

इंग्लंडच्या गोलंदाजीची सुरुवात जोफ्रा आर्चरने केली. जोश टंगने देखील चांगली गोलंदाजी केली. मात्र सलामीची जोडी फोडण्यासाठी विल जॅक्सने 5 व्या ओव्हरमध्ये वैभव सूर्यवंशीला 14 रन्सवर आउट केले. तर सॅम करनने अभिषेक शर्माला 45 रन्सवर आउट केले. लियाम डॉसनने कर्णधार श्रेयस अय्यरला 37 रन्सवर आउट केले. सॅम करनने महत्वपूर्ण 3 विकेट घेतल्या.

IND Vs ENG Live: वैभव सूर्यवंशी घालणार धुमाकूळ; भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

भारत विरुद्ध इंग्लंड पिच रिपोर्ट

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याच्या खेळपट्टीवर फलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. वेगवान गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये प्रभावी ठरले आहेत, पण त्यानंतर धावांचा पाऊस पाहायला मिळतो. मँचेस्टरमध्ये आतापर्यंत एकूण १५ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केवळ चार सामने जिंकले आहेत, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने सहा सामने जिंकले असून पाच सामने रद्द झाले आहेत. येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या सुमारे १५० धावा आहे. इंग्लंडने या खेळपट्टीवर वर्चस्व गाजवले असून, सात सामने जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत.मालिकेत १-० अशी आघाडी घेण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल.

आजपासून 'Vaibhav' पर्व सुरू; सूर्यवंशीने मोडला सचिनचा रेकॉर्ड, टीम इंडियाचा 'बेबी' बॉस मैदानात

भारतीय संघ: संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड: हॅरी ब्रूक (कर्णधार) , जोस बटलर / फिल सॉल्ट, विली जॅक्स, जॉनी बेअरस्टो, लियम लिविंगस्टोन, लियम लिविंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra