Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
IND vs SL: टीम इंडियाला मोठा धक्का! Jasprit Bumrah श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर; WTC मोहिमेवर होणार परिणाम?

IND vs SL: टीम इंडियाला मोठा धक्का! Jasprit Bumrah श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर; WTC मोहिमेवर होणार परिणाम?

  • टीम इंडियाला मोठा धक्का
  • श्रीलंका दौऱ्यातून बुमराह बाहेर
  • पूर्णपणे तंदुरुस्त होणे हेच एकमेव ध्येय
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे.
वृत्तानुसार, बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये प्राथमिक तपासणीनंतरही बुमराहला त्याच्या डाव्या गुडघ्यात वेदना जाणवत होती. त्यामुळे मॅनेजमेंटने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने त्याची संघात निवड केली असली तरी, वैद्यकीय परवानगी मिळाल्यानंतरच त्याचा सहभाग निश्चित केला जाईल. बुमराहच्या अनुपस्थितीमुळे भारताच्या आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप २०२५-२७ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे.

17 वर्षीय Tanvi Sharma ची कमाल! Taipei Open 2026 जिंकून संपवला 18 वर्षांचा दुष्काळ

श्रीलंका दौऱ्यातून बुमराह बाहेर

भारत श्रीलंकेविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मालिकेतील पहिला सामना १५ ऑगस्ट रोजी गॉल येथे खेळला जाईल. तर, दुसरा सामना २३ ऑगस्ट रोजी खेळला जाईल. त्याआधी, भारतीय संघ ७ ऑगस्टपासून कोलंबो येथे श्रीलंकन ​​इलेव्हनविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळेल. भारतीय संघ ४ ऑगस्ट रोजी श्रीलंकेसाठी रवाना होणार आहे. ही मालिका २०२५-२७ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी अत्यंत महत्त्वाची असेल आणि जसप्रीत बुमराहसारख्या गोलंदाजाला संघातून वगळणे हा एक मोठा धक्का आहे.

पूर्णपणे तंदुरुस्त होणे हेच एकमेव ध्येय

जसप्रीत बुमराह सध्या डाव्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत आहे. तो बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये उपस्थित आहे. वृत्तानुसार, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती करण्याचा दिला आहे. टाइम्स ऑफ इंडिया्चया वृत्तानुसार एका सूत्राने सांगितले की, 'पूर्वी खेळाडूंना घाईघाईने संघात घेतले जायचे आणि नंतर संभाव्य नुकसानीमुळे त्यांना वगळण्यात यायचे.पण बुमराहच्या बाबतीत तडजोड केली जाऊ शकत नाही. त्यामुळे, तो पूर्णपणे बरा होणे हेच प्राथमिक ध्येय आहे. या वर्षी अजून खूप क्रिकेट खेळायचे बाकी आहे. आशियाई खेळ, न्यूझीलंड दौरा आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी या सर्व स्पर्धांमध्ये टीम इंडियाला बुमराहची गरज भासेल.'

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघः

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जड़ेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन

Gulveer Singh चा CWG 2026 मध्ये ऐतिहासिक पराक्रम! 5000 मीटरमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra