Dailyhunt
Indian Students in USA:परदेशात शिक्षणाचं स्वप्न की एकटेपणाची शिक्षा? भारतीय विद्यार्थ्याचा व्हायरल व्हिडिओ काय सांगतो? एकदा बघाच..

Indian Students in USA:परदेशात शिक्षणाचं स्वप्न की एकटेपणाची शिक्षा? भारतीय विद्यार्थ्याचा व्हायरल व्हिडिओ काय सांगतो? एकदा बघाच..

  • अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या भावनिक आव्हानांची चर्चा
  • दैंनदिन कामांचे व्यवस्थापन
  • एकटेपणाच्या त्रासांबद्दल बोलताना
Emotional Challenges of Indian Students in USA : परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न कित्येक भारतीय विद्यार्थ्यांचे असते.
परंतु जेव्हा एखादा विद्यार्थी परदेशात पोहोचतो. तेव्हा त्याला अनेक कठीण समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचे कॉलेजमधील मित्र, सुखद कॅम्पस आणि शहरी जीवनातल्या आठवणी जे त्याच्यापासून कित्येक मैल दूर अंतरावर असतात. या परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी निराश होतात, तर काही आपले नशीब म्हणून स्वीकारतात. ते स्वत:ला प्रेरित करतात आणि भविष्यातील यशाच्या आशेने पुढे वाटचाल करतात.

Commercial Tax Officer : सलग अपयशानंतरही जिद्द सोडली नाही; ४१ व्या रँकसह अधिकारी बनलेल्या आशिषची यशोगाथा पहा एका क्लिकवर

भावनिक आव्हानांची चर्चा

अगदी १९ वर्षांचा एका भारतीय विद्यार्थ्यांचा असाच काहीसा अनुभव घेत आहे. तो एका सोशल मीडियाच्या रीलद्वारे अमेरिकेत एकट्याने शिक्षण घेत असल्याचा अनुभव शेयर करत आहे. अमेरिकेत एकटे राहण्यामुळे निर्माण होणाऱ्या भावनिक आव्हानांची चर्चा तो करत आहे. त्याचा अनुभव अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे.


दैंनदिन कामांचे व्यवस्थापन

तो भारतीय विद्यार्थी म्हणतो कि, येथे येण्यापूर्वी स्वत:च्या जेवणाची सोय कशी करायची, पैशांचे व्यवस्थापन कसे करायचे यावर कोणी चर्चा करत नाही. शाळेतून थेट कॉलेजमध्ये आल्याने अनेक गोष्टी बदलतात. मात्र या बदलणाऱ्या परिस्थितीशी कसे जुळवून घ्यायचे? हे कोणी समजावून सांगत नाही.

UPPCS Success Story Monali Singh: कोचिंगशिवाय या जोडप्याने यूपी पीसीएस परीक्षेत कशी मारली बाजी?वाचा थक्क करणारी यशोगाथा

एकटेपणाच्या त्रासांबद्दल बोलताना

कनवने सांगितले कि, अमेरिकेत त्याला त्याच्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट वेगळी वाटते. मग ती संस्कृती असो किंवा लोक. घरापासून दूर राहताना येणाऱ्या अडचणीबद्दल त्याने सांगितले. तो म्हणाला कि, सुट्ट्यांमध्ये घराची आठवण खूप येते. आता घरातील सण समारंभाच्या दरम्यानचे दृश्य त्याला हजारो मैल दूर बसून व्हिडिओ कॉलवरून पहावे लागत आहे.

तो पुढे म्हणतो कि, काही दिवस अपेक्षेपेक्षा जास्त कठीण असतात पण हे क्षण माणसाला प्रगतीकडे जाण्यास मदत करतात. हे अनुभव स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मानसिकरित्या खंबीर बनवतात.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra