होम
इंडोनेशिया | विमान समुद्रात कोसळले, ६२ प्रवाशांना जलसमाधी

इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून पॉण्टिआनलका जाणाऱ्या हा अपघात झाला. श्रीविजया एअरचे हे विमान देशांतर्गत वाहतुक करते. उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या चार मिनिटांत विमान समुद्रात कोसळलं. या विमानात ५० प्रवाशी आणि १२ कर्मचारी होते. या सर्वांचा मृत्यू झाल्याची भिती वर्तण्यात येत आहे.
जकार्ता : इंडोनेशियात एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. एक प्रवासी विमान समुद्रात कोसळले असून यात ६२ प्रवाशांना जलसमाधी मिळली आहे.
इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून पॉण्टिआनलका जाणाऱ्या हा अपघात झाला. श्रीविजया एअरचे हे विमान देशांतर्गत वाहतुक करते. उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या चार मिनिटांत विमान समुद्रात कोसळलं. या विमानात ५० प्रवाशी आणि १२ कर्मचारी होते. या सर्वांचा मृत्यू झाल्याची भिती वर्तण्यात येत आहे.
इंडोनेशियाचे परिवहनमंत्री बुदी कारया सुमादी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एसजे १८२ या विमानाने नियोजित वेळेपेक्षा एक तास विलंबाने म्हणजेच स्थानिक वेळेनुसार दोन वाजून ३६ मिनिटांनी उड्डाण केले. त्यानंतर चार मिनिटांनी या विमानाचा रडार यंत्रणेवरुन संपर्क तुटला. त्यापूर्वी वैमानिकाने हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून विमान समुद्रसपाटीपासून २९ हजार फुटांवर असल्याचे कळविले होते, असे सुमादी यांनी सांगितले.
बोइंग ७३७-५०० या विमानाचे १:५६ वाजता जकार्ताहून उड्डाण झाले आणि २:४० वाजता त्या विमानाचा नियंत्रण मनोऱ्याशी संपर्क तुटला, असे इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयाच्या प्रवक्त्या अदिता इरावती यांनी सांगितले.
मच्छिमारांना समुद्रात विमानाचे काही अवशेष मिळाले आहेत. तसेच शरीराचे अवयव, कपडे आणि इतर काही विमानातील गोष्टींही मिळाल्या आहेत. या सर्वांना पुढील तपासासाठी इंडोनेशियाच्या आधिकाऱ्यांकडे सपूर्द करण्यात आलं आहे. यावरुन विमानातील सर्वांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा