Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
iPhones मधून अचानक गायब झाला Telegram! ना सर्चमध्ये दिसतंय, ना डाऊनलोड होतंय. नेमकं प्रकरण आहे तरी काय?

iPhones मधून अचानक गायब झाला Telegram! ना सर्चमध्ये दिसतंय, ना डाऊनलोड होतंय. नेमकं प्रकरण आहे तरी काय?

  • ॲपलने काही देशांमध्ये ॲप स्टोअरवरून टेलिग्राम तात्पुरते हटवल्याने आयफोन यूजर्समध्ये गोंधळ निर्माण झाला.
  • भारतातील आयफोन यूजर्ससाठी टेलिग्राम अद्याप ॲप स्टोअरवर उपलब्ध असून त्याच्या वापरावर कोणताही परिणाम झालेला नाही.
  • आक्षेपार्ह मजकूर हटवल्यानंतर आणि संबंधित अकाऊंटवर कारवाई केल्यानंतर ॲप पुन्हा ॲप स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले.
तुम्ही देखील आयफोन यूजर आहात का"color: #3366ff;">टेलिग्रामचा वापर करता का"color: #3366ff;"> वॉर्निंगशिवाय रिव्यू केले जात आहेत WhatsApp अकाऊंट! नेमकं प्रकरण आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर

ॲप स्टोअरवरून टेलिग्राम झाला गायब

अलीकडेच समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, जगभरातील अनेक भागांमध्ये आयफोन आणि आयपॅड यूजर्सना ॲप स्टोअरवर टेलिग्राम दिसत नाही. जेव्हा यूजर्स टेलिग्राम प्लॅटफॉर्म सर्च करत आहेत, तेव्हा निकालांत, त्यांना कोणतेही ॲप दिसत नाही. मात्र मॅक ॲप स्टोअरवर हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म अजूनही उपलब्ध आहे आणि अँड्रॉईड यूजर्स देखील गूगल प्ले स्टोअरवरून अगदी सहज हे ॲप डाऊनलोड करू शकणार आहेत. सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजेच, ज्यांनी आधीच फोनमध्ये टेलिग्राम डाऊनलोड केले आहे, त्यांच्यासाठी मेसेजिंग प्लॅटफॉर्मची सर्विस बंद करण्यात आली नाही. (फोटो सौजन्य - AI Created)

भारतातील यूजर्सवर होणार का परिणाम?

भारतातील यूजर्ससाठी दिलासादायक गोष्ट आहे. भारतातील यूजर्सवर अद्याप या निर्णयाचा परिणाम झालेला नाही. त्यामुळे देशातील आयफोन यूजर्स अजूनही ॲप स्टोअरमधून टेलिग्राम डाऊनलोड करू शकणार आहेत आणि त्याचा वापर देखील करू शकतात.

गेमिंगचा खर्च वाढला! Sony ने अचानक वाढवली PS5 ची किंमत, आता मोजावे लागणार अधिक पैसे

कंपनीने का घेतला हा मोठा निर्णय?

ब्लूमबर्गचे दिग्गज टेक रिपोर्टर मार्क गुरमन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचे कारण स्पष्टपणे सांगितलं आहे. ॲपलने स्पष्टपणे सांगितलं आहे की, टेलिग्रामवर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर आढळला, जो त्यांच्या कठोर धोरणांचे उल्लंघन करतो. ॲपलच्या म्हणण्यानुसार, टेलिग्रामच्या डेव्हलपर्सनी तो आक्षेपार्ह मजकूर काढून टाकून तो पोस्ट करणाऱ्या वापरकर्त्याला ब्लॉक करताच, ॲपला स्टोअरमध्ये त्वरित री-स्टोअर करण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra