Thursday, 06 May, 6.05 pm नवराष्ट्र

क्रीडा
IPL 2021 | सगळे खेळाडू सुखरुप घरी पोहचल्यानंतरच मी हॉटेलमधून बाहेर पडणार : महेंद्र सिंह धोनी

आयपीएल भारतामध्येच होत असल्याने परदेशातून आलेल्या खेळाडूंना आणि सपोर्टींग स्टाफला घरी जाण्यासाठी आपण सर्वांनी प्रथम प्राधान्य द्यायला हवं. त्यानंतर भारतीय खेळाडूंची व्यवस्था करण्यात यावी, असं मत धोनीने मांडलं.

    भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापनाला आपल्या संघातील सर्व सहकारी त्यांच्या घरी सुखरुप परतल्यानंतरच आपण घरी जाणार असल्याचं सांगितलं आहे.आपल्या आधी परदेशातून आयपीएल खेळण्यासाठी आलेल्या चेन्नईच्या खेळाडूंची आणि त्यानंतर भारताच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या चेन्नईच्या खेळाडूंची घरी जाण्याची व्यवस्था करावी असं धोनीने म्हटलं आहे. मी सर्वजण गेल्यानंतरच इथून निघाणार आहे, असं धोनीने व्यवस्थापनाला कळवलं आहे.

    आयपीएल भारतामध्येच होत असल्याने परदेशातून आलेल्या खेळाडूंना आणि सपोर्टींग स्टाफला घरी जाण्यासाठी आपण सर्वांनी प्रथम प्राधान्य द्यायला हवं. त्यानंतर भारतीय खेळाडूंची व्यवस्था करण्यात यावी, असं मत धोनीने मांडलं.

    हे हॉटेल सोडणारा मी सीएसकेचा शेवटचा खेळाडू असेल, असं माहीने आम्हाला सांगितलं. सर्व परदेशी खेळाडूंनी आधी त्यांच्या मायदेशी जाण्यासाठी निघावं त्यानंतर भारतीय खेळाडूंचा विचार करण्यात यावा असंही त्याने म्हटलं. तो गुरुवारी सायंकाळी रांचीसाठी रवाना होण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra
Top