Dailyhunt
IPL 2026: हार्दिकचे ग्रह फिरले! कप्तानी चालेना, नावावर झाला 'नको' तो विक्रम, Mumbai Indians ची गेली रया

IPL 2026: हार्दिकचे ग्रह फिरले! कप्तानी चालेना, नावावर झाला 'नको' तो विक्रम, Mumbai Indians ची गेली रया

  • हार्दिक पंड्याची खराब कॅप्टन्सी
  • मुंबई इंडियन्सची मान खाली
  • हार्दिकच्या नावावर नको असणार विक्रम
मुंबई इंडियन्स २००८ पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. यावर्षीदेखील पहिलाच सामना मुंबई इंडियन्सनेजिंकत चाहत्यांना आनंद मिळवून दिला होता.
मात्र आता मुंबई इंडियन्सची कामगिरी पाहता प्लेऑफमध्ये पोहचणं कठीण असल्याचं दिसून येत आहे. हार्दिक पांड्याच्या आधी, मुंबई इंडियन्सचे आठ कर्णधार होऊन गेले आहेत: हरभजन सिंग, शॉन पोलॉक, सचिन तेंडुलकर, ड्वेन ब्राव्हो, रिकी पाँटिंग, रोहित शर्मा, कायरोन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव. हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाखाली, मुंबईला गेल्या नऊ सामन्यांमध्ये अशा आव्हानांचा सामना करावा लागला आहे, ज्यांचा सामना त्यांना इतर कोणत्याही कर्णधाराच्या नेतृत्वाखाली करावा लागला नव्हता.

दोनदा २०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पार केले. हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाखाली, मुंबईने गेल्या वर्षीचा क्वालिफायर २ हा सामना २०० पेक्षा जास्त धावा करून गमावला होता. मुंबईविरुद्ध २०० किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पार करणारा हा पहिलाच संघ होता. आता, सनरायझर्स हैदराबादने मुंबईविरुद्ध २४४ धावांचे लक्ष्य आठ चेंडू शिल्लक असताना सहजपणे पूर्ण केले. इतके मोठे लक्ष्य असूनही मुंबई इंडियन्सचा संघ व्यवस्थित बचाव न करू शकल्याने सगळीकडे ट्रोल होताना दिसून येत आहे.

Rohit Sharma Birthday: स्वत:पेक्षा संघाला मोठं करणारा 'कॅप्टन'; विक्रमांच्या 'हिटमॅन'चा आज वाढदिवस

मुंबई बचाव करण्यात अजिंक्य होती

मुंबई इंडियन्स लक्ष्याचा बचाव करण्यात पारंगत होती. संघाने पहिल्या डावात १५० पेक्षा कमी धावा करून तीन वेळा आयपीएलचा अंतिम सामना जिंकला आहे. २०१७ मध्ये, मुंबईने अंतिम सामन्यात १२९ धावा करूनही लक्ष्याचा बचाव केला होता. मुंबईविरुद्ध आतापर्यंतचा सर्वात मोठा धावांचा पाठलाग १९६ धावांचा होता. २०२० मध्ये, बेन स्टोक्सच्या शतकामुळे राजस्थान रॉयल्सने सामना जिंकला होता.

हार्दिकचे कर्णधारपद यशस्वी ठरत नाहीये

२०२४ च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले होते. त्याला गुजरात टायटन्सकडून संघात घेण्यात आले होते. त्याच्या कर्णधारपदाखाली गुजरातने २०२२ चा हंगाम जिंकला आणि २०२३ मध्ये उपविजेतेपद पटकावले. संघाला पाच आयपीएल विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माची जागा घेतल्यानंतर त्याने ही जबाबदारी स्वीकारली होती. त्या हंगामात मुंबई गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिली. २०२५ च्या हंगामात संघ प्लेऑफमध्ये पोहोचला, परंतु २०२६ मध्ये परिस्थिती पुन्हा एकदा बिकट झाली आहे. नऊ सामन्यांनंतर, मुंबई दोन विजयांसह गुणतालिकेत ९ व्या क्रमांकावर आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra