Dailyhunt
IPL 2026 Points Table: लागोपाठ दोन पराभवानंतरही PKBS टॉपवर, Mumbai Indians प्लेऑफच्या रेसमधून बाहेर

IPL 2026 Points Table: लागोपाठ दोन पराभवानंतरही PKBS टॉपवर, Mumbai Indians प्लेऑफच्या रेसमधून बाहेर

  • दोन पराभवानंतर पंजाब किंग्जच टॉपवर
  • मुंबई इंडियन्सची दैना
  • प्लेऑफच्या शर्यतीबाहेर
रविवारी, स्टार सलामीवीर साई सुदर्शनच्या ५७ धावांच्या खेळीच्या आणि भेदक गोलंदाजांच्या त्रिकुटाच्या जोरावर गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सचा पराभव केला.
मोहम्मद सिराज, जेसन होल्डर आणि कागिसो रबाडा यांच्या भेदक गोलंदाजीमुळे टायटन्सने पंजाबला १६३ धावांवर रोखले. सुदर्शनने पुन्हा एकदा दमदार खेळी करून संघाला विजयी लक्ष्य गाठण्यास मदत केली. पदार्पण करणाऱ्या सूर्यांश शेडगेनेही ५७ धावा केल्या. पराभव होऊनही, पंजाब गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे.

पंजाबचा पराभव आणि गुजरातचा विजय होऊनही इंडियन प्रीमियर लीग २०२६ ची गुणतालिका अपरिवर्तित राहिली आहे. श्रेयस अय्यरचा संघ पंजाब अव्वल स्थानी कायम आहे. गुजरात टायटन्स गुणतालिकेत पाचव्या स्थानावर कायम आहे. या विजयानंतर, शुभमन गिलच्या संघाकडे आता १२ गुण झाले आहेत, तर पंजाब किंग्स १३ गुणांवर आहे. यामुळे गुजरात टायटन्सचीप्लेऑफमध्ये जाण्याची संधी वाढली आहे. कसा आहे आता गुणतालिका चार्ट

Gujarat Beat Punjab: श्वास रोखणाऱ्या सामन्यात गुजरातचा थरारक विजय! पंजाबवर ४ गडी राखून मात; रोमांच पोहचला शिगेला

गुणतालिकेत कोणताही बदल नाही

टाईम टेबल पॉईंट्स (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

सध्या, पंजाबने खेळलेल्या ९ सामन्यांमधून १३ गुण मिळवले आहेत, ज्यात ६ विजय, २ पराभव आणि एक बरोबरी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, पंजाबइतकेच सामने खेळून, ६ विजय आणि ३ पराभवांसह १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबादने १० सामने खेळले असून, त्यात ६ विजय आणि ४ पराभव आहेत. या संघाचेही १२ गुण आहेत. राजस्थान रॉयल्स आणि गुजरातने हैदराबादइतकेच सामने खेळले आणि जिंकले आहेत. नेट रन रेटनुसार, ते सध्या अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. यामुळे आता कोणता संघ पहिल्या चारमध्ये येणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.

कशी आहे स्थिती

चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सने ९ सामने खेळून ४ विजय मिळवले असून, प्रत्येकी ८ गुण आहेत. गुणतालिकेत चेन्नई सहाव्या आणि दिल्ली सातव्या स्थानावर आहे. कोलकाता नाइट रायडर्सने ९ पैकी ३ सामने जिंकले असून ते आठव्या स्थानावर आहेत. मुंबई ९ सामन्यांनंतर केवळ २ विजयांसह नवव्या स्थानावर आहे. सर्वात तळाशी लखनौ सुपर जायंट्स आहे, ज्याने आतापर्यंत ८ सामने खेळून फक्त २ सामने जिंकले आहेत.

GT vs PBKS Live Socre: पंजाबचा 'सूर्या' चमकला! गुजरातसमोर 164 धावांचे लक्ष्य; 47 धावांत 5 गडी गमावल्यानंतर शेडगेने सावरला डाव

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra