Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
IPL Final 2026: IPL फायनलचा थरार!  विजेत्यावर होणार 'इतक्या' कोटींचा वर्षाव; उपविजेताही होणार मालामाल; जाणून घ्या प्राइज मनी

IPL Final 2026: IPL फायनलचा थरार! विजेत्यावर होणार 'इतक्या' कोटींचा वर्षाव; उपविजेताही होणार मालामाल; जाणून घ्या प्राइज मनी

  • विजेत्यावर होणार ‘इतक्या’ कोटींचा वर्षाव
  • उपविजेताही होणार मालामाल
  • जाणून घ्या प्राइज मनी
आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि (Gujarat Titans) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर थरारक लढत रंगणार आहे दोन्ही संघ विजेतेपदासाठी सज्ज असून या सामन्यासोबतच कोट्यवधी रुपयांच्या प्राइज मनीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
यंदाच्या हंगासासाठी बीसीसीआयने विजेत्या आणि उपविजेत्या संघासाठी मोठी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. त्यामुळे विजेत्या संघावर पैशांचा अक्षरशः वर्षाव होणार आहे. किती आहे आयपीएल २०२६ ची प्राइज मनी, जाणून घेऊयात.

RCB vs GT Final: बंगळुरु-गुजरातमध्ये रंगणार अंतिम युद्ध, कोणाचं पारडं जड? कशी असेल संभाव्य प्लेइंग 11? जाणून घ्या

विजेत्या संघाला किती मिळणार?

मीडिया रिपोर्टनुसार, आयपीएल 2026 चे विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला तब्बल २० कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तर अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या उपविजेत्या संघालाही १३ कोटी रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय प्लेऑफमध्ये तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या राजस्थान रॉयल्सला ७ कोटी आणि चौथ्या स्थानावरील संघाला ६.५ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात एकूण 46 कोटी रुपयांहून अधिक प्राइज मनी वितरित केली जाणार आहे. तसेच, प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या सर्व संघांवर पैशांचा पाऊस पडणार आहे.

ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपलाही मोठे बक्षीस

फक्त संघांनाच नव्हे तर वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही मोठ्या रकमांचे पुरस्कार दिले जाणार आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाईल. या दोन्ही पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. यंदाच्या हंगामात वैभव सूर्यवंशी, विराट कोहली आणि साई सुदर्शन यांच्यात ऑरेंज कॅपसाठी चुरस पाहायला मिळत आहे. तर कगिसो रबाडा आणि भुवनेश्वर कुमार पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

RCB आणि GT दोघांसाठी ऐतिहासिक संधी

आरसीबी आणि गुजरात या दोन्ही संघांसाठी ही फायनल अत्यंत महत्त्वाची आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबी पुन्हा एकदा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सला दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. दोन्ही संघांचा हंगाम दमदार राहिला असून फायनमध्ये कोणता संघ बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. ट्रॉफी, प्रतिष्ठा आणि कोट्यवधींची प्राइज मनी यामुळे ही अंतिम लढत अधिकच रोमांचक ठरणार आहे. तसेच, अहमदाबादच्या मैदानावर कोणता संघ इतिहास रचतो, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

RCB vs GT Final पूर्वीच गुजरातला वादळाचा तडाखा; प्रवासाला विलंब; अवघे काही तास आधी टायटन्स अहमदाबादमध्ये दाखल

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra