Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Iran-US War : 'अमेरिकेशी युद्ध आम्ही जिंकलो'; गालीबाफ यांचा मोठा दावा

Iran-US War : 'अमेरिकेशी युद्ध आम्ही जिंकलो'; गालीबाफ यांचा मोठा दावा

  • Iran-US War
  • गालीबाफ यांचा दावा
तेहरान : इराणचे संसदाध्यक्ष मोहम्मद बाघेर गालीबाफ यांनी अमेरिकेसोबतच्या संघर्षाबाबत मोठे विधान करत, “अमेरिकेशी झालेल्या युद्धात आम्ही विजय मिळवला,” असा दावा केला आहे.
त्यांनी हा विजय केवळ लष्करी ताकदीचा नसून इराणी जनतेच्या एकजुटीचा, सशस्त्र दलांच्या तयारीचा आणि देशाच्या नेतृत्वाच्या ठाम भूमिकेचा परिणाम असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मध्य पूर्वेतील बदलत्या राजकीय आणि सामरिक समीकरणांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

US IRAN WAR : इराणला चारही बाजूंनी घेरण्याची तयारी ? अमेरिकेच्या नव्या डावाची चर्चा .

गालीबाफ यांनी आपल्या भाषणात अमेरिकेवर टीका करताना, इराणवर विविध प्रकारचे राजकीय, आर्थिक आणि लष्करी दबाव आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्या सर्व प्रयत्नांना इराणने यशस्वीपणे तोंड दिले आणि देशाच्या सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड केली नाही, असे त्यांनी म्हटले. इराणच्या सशस्त्र दलांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही देशाचे संरक्षण केल्याचे त्यांनी नमूद केले.

त्यांनी पुढे सांगितले की, कोणत्याही बाह्य दबावापुढे इराण झुकणार नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर देशाची भूमिका कायम ठाम राहील आणि भविष्यातही इराण आपल्या हितांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती प्रत्येक पावले उचलेल. गालीबाफ यांच्या मते, संघर्षाच्या काळात इराणी जनतेने दाखविलेली एकजूट आणि संयम हेच देशाच्या ताकदीचे सर्वात मोठे प्रतीक ठरले.

US IRAN WAR : इराणला चारही बाजूंनी घेरण्याची तयारी ? अमेरिकेच्या नव्या डावाची चर्चा .

प्रतिक्रिया ?

दरम्यान, गालीबाफ यांच्या या विधानाकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष लागले आहे. अमेरिका किंवा इतर पाश्चात्त्य देशांकडून त्यांच्या वक्तव्यावर तत्काळ अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, मध्य पूर्वेतील तणाव अद्याप पूर्णपणे निवळलेला नसल्याने अशा विधानांमुळे प्रादेशिक राजकारण पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Pakistan Gang War: 'धुरंधर' चित्रपटातील गुंड उझैर बलोचच्या भावावर कराचीत गोळीबार; प्रकृती अत्यंत गंभीर

विश्लेषकांच्या मते, अशा प्रकारची विधाने अनेकदा देशांतर्गत जनतेचा आत्मविश्वास वाढविणे, राजकीय संदेश देणे किंवा परराष्ट्र धोरणाबाबत ठाम भूमिका दर्शविणे या उद्देशाने केली जातात. त्यामुळे गालीबाफ यांचे वक्तव्य हे इराणची अधिकृत राजकीय भूमिका अधोरेखित करणारे मानले जात असले, तरी “युद्ध आम्ही जिंकलो” हा त्यांचा दावा स्वतंत्रपणे पडताळलेला नाही. त्यामुळे या वक्तव्याकडे दावा म्हणूनच पाहणे योग्य ठरेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra