Dailyhunt
जागतिक आरोग्याच्या शाश्वतीसाठी WHO ची झाली स्थापना; जाणून घ्या 07 एप्रिलचा इतिहास

जागतिक आरोग्याच्या शाश्वतीसाठी WHO ची झाली स्थापना; जाणून घ्या 07 एप्रिलचा इतिहास

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची आरोग्य संस्था असून तिची स्थापना ७ एप्रिल १९४८ रोजी झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक स्तरावर आरोग्यविषयक समस्या वाढत होत्या.

विविध देशांमध्ये संसर्गजन्य आजार, कुपोषण आणि अपुरी वैद्यकीय सुविधा यामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत होते. या पार्श्वभूमीवर सर्व देशांनी एकत्र येऊन जागतिक आरोग्य सुधारण्यासाठी WHO ची स्थापना केली. WHO चे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सर्व लोकांना सर्वोच्च आरोग्य सुविधा मिळवून देणे. संस्था लसीकरण मोहिमा, रोगप्रतिबंध, संशोधन आणि आपत्ती व्यवस्थापन यावर कार्य करते. पोलिओ, क्षयरोग, मलेरिया यांसारख्या आजारांविरोधात WHO ने मोठे योगदान दिले आहे. आज WHO जगभरातील आरोग्य धोरणे ठरवण्यात आणि देशांना मार्गदर्शन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य व्यवस्थेत या संस्थेचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. (Dinvishesh)

07 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1875 : आर्य समाजाची स्थापना झाली.
  • 1827 : जॉन वॉकर या इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ्याने आपली पहिली घर्षण काडेपेटी विकली. त्याने आदल्या वर्षी हिचा शोध लावला होता
  • 1906 : माउंट व्हेसुव्हियसचा उद्रेक होऊन नेपल्स शहराचा नाश झाला..
  • 1927 : AT&T अभियंता हर्बर्ट इव्हस यांनी पहिले लांब-अंतराचे सार्वजनिक दूरदर्शन प्रसारण (वॉशिंग्टन, डी.सी., वाणिज्य सचिव हर्बर्ट हूवर यांची प्रतिमा प्रदर्शित करून न्यूयॉर्क शहरापर्यंत) प्रसारित केले.
  • 1939 : दुसरे महायुद्ध - इटलीने अल्बेनियावर आक्रमण केले.
  • 1940 : पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्ण्वर्णीय अमेरिकन ठरले.
  • 1948 : जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली.
  • 1964 : आय.बी.एम. सिस्टम 360 ची घोषणा.
  • 1989 : लाथा नावाच्या विषारी दारूमुळे बडोद्यात 128 जणांचा मृत्यू झाला.
  • 1996 : श्रीलंकेचा क्रिकेटपटू फलंदाज सनथ जयसूर्याने सिंगरकरंडक स्पर्धेत 17 चेंडूत विश्वविक्रमी अर्धशतक झळकावले.
  • 2022 : केतनजी ब्राउन जॅक्सनची युनायटेड स्टेट्सच्या सर्वोच्च न्यायालयासाठी पुष्टी झाली, ती पहिली कृष्णवर्णीय महिला न्यायमूर्ती बनली.
हे देखील वाचा : जागतिक वारसस्थळांची जबाबदारी कोणाची? युद्धामध्ये भक्ष्यस्थानी वारसास्थळे अन् इतिहासाचे साक्षीदार

07 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष

  • 1506 : 'सेंट फ्रान्सिस झेविअर' - ख्रिस्ती धर्मप्रसारक यांचा जन्म. (मृत्यू: 3 डिसेंबर 1552)
  • 1770 : 'विल्यम वर्डस्वर्थ' - स्वच्छंदतावादाचे प्रणेते आणि इंग्लिश कवी यांचा जन्म. (मृत्यू: 23 एप्रिल 1850)
  • 1860 : 'विल केलॉग' - केलॉग्ज चे मालक यांचा जन्म. (मृत्यू: 6 ऑक्टोबर 1951)
  • 1891 : 'सर डेविड लो' - जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 19 सप्टेंबर 1963)
  • 1920 : 'पंडित रविशंकर' - भारतरत्‍न सतार वादक यांचा जन्म. (मृत्यू: 12 डिसेंबर 2012)
  • 1925 : 'चतुरानन मिश्रा' - केंद्रीय कृषिमंत्री व कामगार नेते यांचा जन्म. (मृत्यू: 2 जुलै 2011)
  • 1938 : 'काशीराम राणा' - भाजपाचे लोकसभा सदस्य यांचा जन्म. (मृत्यू: 31 ऑगस्ट 2012)
  • 1942 : 'जितेंद्र' - हिंदी चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
  • 1954 : 'जॅकी चेन' - हाँग काँगचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
  • 1982 : 'सोंजय दत्त' - भारतीय वंशाचा अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर यांचा जन्म
हे देखील वाचा : आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या बळावर आरोग्यसेवेची नवी दिशा; AI ठरतोय गेमचेंजर?

07 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1498 : 'चार्ल्स (आठवा)' - फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म: 30 जून 1470)
  • 1935 : 'डॉ. शंकर आबाजी भिसे' - भारतीय शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 29 एप्रिल 1867)
  • 1947 : 'हेन्री फोर्ड' - फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 30 जुलै 1863)
  • 1977 : 'राजा बढे' - चित्रपट अभिनेते, लेखक आणि गीतकार यांचे निधन. (जन्म: 1 फेब्रुवारी 1912)
  • 2001 : गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा 'डॉ. जी. एन. रामचंद्रन' - जगप्रसिद्ध जैवभौतिक शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 8 ऑक्टोबर 1922)
  • 2004 : 'केलुचरण महापात्रा' - प्रसिद्ध ओडिसी नर्तक यांचे निधन. (जन्म: 8 जानेवारी 1926)
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra