Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Jalgaon Crime News: जन्मदात्या बापाचं क्रूर रूप! झोपेत असलेल्या मुलांवर कुऱ्हाडीचे वार; 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर

Jalgaon Crime News: जन्मदात्या बापाचं क्रूर रूप! झोपेत असलेल्या मुलांवर कुऱ्हाडीचे वार; 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर

  • चोपडा तालुक्यात वडिलांनी झोपेत असलेल्या दोन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याचा आरोप.
  • 13 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू, तर 11 वर्षीय मुलगा गंभीर जखमी असून उपचार सुरू.
  • आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून हल्ल्यामागील कारणाचा तपास सुरू आहे.
जळगाव :जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापानेच झोपेत असलेल्या आपल्या दोन निष्पाप मुलांवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या भीषण हल्ल्यात 13 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर 11 वर्षीय मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले असून हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ, बसप्रवासात महिलांच्या दागिन्यांवर मारला डल्ला; तब्बल…

काय घडलं नेमकं?

सुभाष गोपाळ भिलाला (वय 50) असे आरोपी पित्याचे नाव आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास दोन्ही मुले घरात गाढ झोपेत होती. त्यावेळी त्यांचा वडील सुभाष याने हातातील कुऱ्हाडीने दोन्ही मुलांवर अचानक हल्ला केला. झोपेत असल्यामुळे मुलांना स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. डोक्यावर आणि शरीरावर झालेल्या गंभीर वारांमुळे मीराचा जागीच मृत्यू झाला, तर रामू गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.
शेजारी आणि ग्रामस्थांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने जखमीला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी उच्चस्तरीय रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांकडून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

आरोपीचा तपास सुरु?

पोलिसांनी मृत्यू झालेल्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. हल्ला केल्यांनतर आरोपी सुभाष भिलाला हा जवळील जंगलाच्या दिशेने फरार झाला. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पोलिसांनी नाकेबंदी केली. पोलिसांच्या काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे हल्लयांमागील करणाबाबत कसून चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून हल्ल्यात वापरण्यात आलेली कुऱ्हाड आणि इतर महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतले आहेत. त्याने हल्ला का केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.

दौंडमध्ये तरुणीचे अपहरण, कारमध्ये बसवले अन्…; माजी नगराध्यक्षासह 11 जणांविरोधात गुन्हे दाखल

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra