Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Jalgaon News: भुसावळमार्गे प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा! तीन विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ

Jalgaon News: भुसावळमार्गे प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा! तीन विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ

  • उधना-झंझारपूर विशेष गाडी २७ सप्टेंबर २०२६ पर्यंत धावणार.
  • परतीची झंझारपूर-उधना गाडी २८ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार.
  • सणासुदीच्या गर्दीत प्रवाशांना अतिरिक्त रेल्वेसेवेचा पर्याय मिळू शकतो.

सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत त्यामुळे सगळीकडे गर्दी वाढली आहे. रेल्वे स्टेशनवर तर पाय ठेवायला जागा नसल्याने रेल्वेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भुसावळमार्गे जाणाऱ्या तीन स्पेशल गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. साईनगर शिर्डीते बिकानेर, उधना ते झंझारपूर आणि उधना ते मधुबनी या तीन गाड्यांना मुदतवाढ करण्यात आली. या निर्णयामुळे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि बिहारमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना खूप फायदा होईल. ज्यांना रिझर्वेशन मिळत नव्हतं त्यांना आता या गाड्यांमध्ये जागा मिळू शकते. Jalgaon News:

उधना ते झंझारपूर गाडी कधीपर्यंत धावणार?

उधना ते झंझारपूर साप्ताहिक स्पेशल गाडी नंबर 09047 आधी 13 सप्टेंबरपर्यंतच धावणार होती. पण आता रेल्वेने तिला 27 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवली आहे. अजून दोन आठवडे ही गाडी धावेल.तसंच परतीची गाडी झंझारपूर ते उधना, गाडी नंबर 09048, ती आधी 14 सप्टेंबरपर्यंत होती. आता ती 28 सप्टेंबर 2026 पर्यंत धावणार आहे. बिहार आणि गुजरातमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी ही गाडी खूप महत्त्वाची आहे. नेहमीच्या गाड्यांमध्ये खूप गर्दी असते, त्यामुळे या स्पेशल गाडीमुळे गर्दी थोडी कमी होईल.

शिर्डी ते बिकानेर गाडीला मोठी मुदतवाढ

साईनगर शिर्डी ते बिकानेर साप्ताहिक स्पेशल गाडी नंबर 04716 ला सगळ्यात मोठी मुदतवाढ मिळाली आहे. ही गाडी आता 4 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे. म्हणजे दिवाळीपर्यंत ही सेवा सुरु राहणार आहे.

Jalgaon Ganesh Visarjan 2026: गणेश विसर्जनासाठी मार्ग सज्ज! ९० …

परतीची गाडी बिकानेर ते साईनगर शिर्डी, गाडी नंबर 04715, ती पण 3 ऑक्टोबर 2026 ते 28 नोव्हेंबर 2026 पर्यंत धावेल. राजस्थानातून शिर्डीला येणाऱ्या भाविकांसाठी आणि महाराष्ट्रातून राजस्थानात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही खूप चांगली बातमी आहे. सणाच्या काळात याच मार्गावर सगळ्यात जास्त गर्दी असते.

Jalgaon Crime: ज्यांच्यावर होता जीवापाड विश्वास, त्यांनीच रचला काळा डाव …

उधना ते मधुबनी गाडी पण वाढवली

तिसरी गाडी आहे उधना ते मधुबनी साप्ताहिक स्पेशल, गाडी नंबर 09045. ही गाडी पण आधी 13 सप्टेंबरपर्यंतच होती, आता ती 27 सप्टेंबरपर्यंत धावेल.आणि परतीची मधुबनी ते उधना गाडी नंबर 09046, ती आधी 14 सप्टेंबरपर्यंत होती, आता 28 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत राहणार आहे.रेल्वेने हा निर्णय अगदी वेळेवर घेतला आहे. गणपती, नवरात्र आणि दिवाळीच्या तोंडावर सगळ्यांनाच गावी जायचं असतं. अशा वेळी या तीन स्पेशल गाड्यांमुळे हजारो प्रवाशांचा प्रवास सुखाचा होणार आहे. जर तुम्हाला पण या मार्गावर जायचं असेल तर लवकरात लवकर तिकीट बुक करा, कारण या गाड्या पण लवकर फुल होऊ शकतात.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra