Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
JEE NEET Merger : जेईई आणि नीट परीक्षा कायमच्या बंद होणार? केंद्र सरकार 'वन नेशन वन एक्झाम' मॉडेल कधी लागू करणार?

JEE NEET Merger : जेईई आणि नीट परीक्षा कायमच्या बंद होणार? केंद्र सरकार 'वन नेशन वन एक्झाम' मॉडेल कधी लागू करणार?

JEE NEET Merger 2026: देशातील प्रमुख प्रवेश परीक्षा ‘जेईई मेन’ आणि ‘नीट’ च्या मोठ्या बदलाबाबत चर्चा आता वेगाने सुरू हे आहेत. नुकत्याच समोर आलेल्या पेपर लीकच्या वादानंतर केंद्र सरकार परीक्षा प्रणालीमध्ये सुधारणा आणि सुरक्षा निर्माण करण्यासाठी एका नवीन मॉडेलवर विचार करत आहेत.

या प्रस्तावांतर्गत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी एकच ‘संयुक्त राष्ट्रीय प्रवेश परीक्षा’ (Unified Entrance Exam) लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

"वन नेशन वन एक्झाम"

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकार लवकर "One Nation One Exam" या मॉडेलवर आधारित नीट आणि जेईई परीक्षा सामारिकरित्या घेतल्या जाण्याची शक्यता आहे. या प्रणालीअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर एकच परीक्षा घेतली जाईल. परंतु, शाखेनुसार वेगवेगळे भाग केले जातील. यामध्ये इंजिनिअरिंगच्या उमेद्वारांसाठी (Maths) आणि मेडिकलच्या उमेदवारांसाठी जीवशास्त्र (Biology) स्वतंत्र विभागात समाविष्ट केले जाऊ शकते, तर भौतिकशास्त्र (Physics) आणि रसायनशास्त्र (Chemistry) हे दोन्ही शाखांसाठी कॉमन (सामायिक) असतील.

NEET UG 2026 परीक्षा फी रिफंडची तारीख का बदलली? आता ‘या’ नवीन तारखेपर्यंत बँक डिटेल्स भरण्याची संधी; अर्ज कुठे व कसा करावा?

या प्रस्तावाचा मुख्य उद्देश परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या मजबूत बनवणे हा आहे. गेल्या काही वर्षांतील पेपर लीक आणि गैरप्रकारांच्या घटना लक्षात घेऊन सरकार मोठे बदल करण्याच्या दिशेने पावले टाकत आहे.

राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये सुधारणा

नीट युजी २०२४ च्या वादानंतर इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती (High Level Committee) स्थापन्यात आली. याचे मुख्य कार्य राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी सुचवलेल्या उपायंवर काम करणे हे आहे.

NTA ची भूमिका आणि संभाव्य बदल

सध्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) कार्यपद्धतीवरही सात्यत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आता सरकार परीक्षा संचालन प्रणाली आणखी मजबूत करण्यासाठी, डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये (Digital Infrastructure)सुधारणा करण्यासाठी आणि बाहेरील यंत्रणावरील(External Agencies) अवलंबित्व कमी करण्यासाठी हा विचार करत आहे.

यंदा ‘UPSC Prelims 2026’ अत्यंत आव्हानात्मक का ठरली? आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजय कुमार यांनी उमेद्वारांना दिली महत्त्वाची माहिती!

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra