शरीरात थकवा जाणवण्याची कारणे? कोणत्या आजारांमुळे अशक्तपणा वाढतो?
थकवा अशक्तपणावर घरगुती उपाय?
जीवनशैलीतीलबदलांमुळे थकवा, अशक्तपणा किंवा मानसिक तणाव जाणवणे अतिशय सामान्य आहे. पण वारंवार शरीरात वाढलेल्या थकवा आणि अशक्तपणाकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते.
कामाचा वाढता तणाव, पोषक घटकांची कमतरता, हवामानात सतत होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात सतत थकवा जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ शकते. शरीर कायमच फिट आणि निरोगी राहिल्यास उत्साहाने काम करण्याची इच्छा होते, पण अशक्तपणा वाढल्यास काम करण्याची किंवा खाण्यापिण्याची इच्छा होत नाही.(फोटो सौजन्य - istock)
दिवसभराची शांत झोप घेतल्यानंतर सुद्धा शरीरात थकवा अशक्तपणा जाणवत असेल तर लिव्हर किंवा हृद्यासंबंधित आजाराची लक्षणे असू शकतात. लठ्ठपणा वाढल्यानंतर शरीरातील ऊर्जा कमी होऊन जाते आणि थोडस काम केल्यानंतर सुद्धा थकल्यासारखे वाटते. शरीरावर वाढलेल्या अनावश्यक चरबीमुळे वेगवेगळ्या अवयवांवर जास्तीचा तणाव येण्याची शक्यता असते. यामुळे लवकर थकवा आणि सुस्ती येते. चला तर जाणून घेऊया कोणत्या आजारांची लागण झाल्यानंतर शरीरात खूप जास्त थकवा जाणवतो, याबद्दल सविस्तर माहिती.
या आजारांचा वाढू शकतो गंभीर धोका:
चुकीचा आहार, पोषक घटकांचा अभाव, शारीरिक हालचालींचा अभाव, मानसिक तणाव, अपुरी झोप इत्यादी सवयींमुळे आजार वाढू शकतात. याशिवाय मधुमेह, उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर आणि हृदयविकार यांसारख्या आजारांची लागण झाल्यानंतर शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू शकतो. या समस्यांकडे सामान्य दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतू शकते. त्यामुळे वेळीच योग्य उपचार आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे.
वारंवार शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करून घेणे फार आवश्यक आहे. थकव्यासोबतच वजन वाढणे, श्वास लागणे, भूक कमी होणे किंवा शरीरात इतर कोणतेही बदल जाणवत असल्यास अजिबात दुर्लक्ष करू नये. जीवनशैलीत होणारे छोटे मोठे बदल कामावर परिणाम करतात. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
आईच्या दुधाचा पहिला थेंब… आरोग्याचा पाया, आई-बाळ यांच्यातील स्तनपानाचा धागा कायम ठेवण्याचे प्रयत्न
जीवनशैलीत कोणते बदल करावे:
कायमच हेल्दी आणि आनंदी राहण्यासाठी नियमित भरपूर पाणी, पालेभाज्या, फळे, पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. संतुलित आणि सहज पचन होणारा आहार घेतल्यास शरीर कायमच निरोगी राहते. नियमित योगासने, व्यायाम, ध्यान केल्यास मानसिक तणाव कमी होतो. दिवसभरातून एकदा ४० मिनिट चालणे गरजेचे आहे. रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये ३ तासांचे अंतर ठेवल्यास पचनक्रिया निरोगी राहील.
टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

