Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
झोपेतून उठल्यानंतर लगेच चहा पित असाल तर थांबा! जाणून घ्या उपाशी पोटी चहा पिण्याचे तोटे, उद्भवतील गंभीर समस्या

झोपेतून उठल्यानंतर लगेच चहा पित असाल तर थांबा! जाणून घ्या उपाशी पोटी चहा पिण्याचे तोटे, उद्भवतील गंभीर समस्या

हा पिण्याचे तोटे? दिवसभरात किती वेळा चहा प्यावा?
चहा कॉफीच्या सेवनामुळे उद्भवणाऱ्या समस्या?

भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये असंख्य चहाप्रेमी आहेत. चहा प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही.

चहा प्याल्यामुळे शरीर फ्रेश आणि ताजेतवाने वाटते. पण उपाशी पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन करणे शरीरासाठी धोक्याचे ठरते. काहींना झोपेतून उठल्यानंतर लगेच चहा प्यायला लागतो तर काही दिवसभरात ५ ते ६ वेळा चहा पितात. यामुळे झोपेची सुस्ती उडून जाते पण शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. उपाशी पोटी चहाच्या सेवनामुळे शरीराच्या पचनक्रियेवर गंभीर परिणाम होतात. ही सवय शरीरासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे उठल्यानंतर लगेच चहा पिऊ नये. सकाळचा पोटभर नाश्ता करूनच चहा किंवा कॉफीचे सेवन करावे, अन्यथा वारंवार पचनक्रिया बिघडू शकते. आज आम्ही तुम्हाला उपाशी पोटी चहा प्यायल्यामुळे शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य - istock)

तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन खाऊन जिवंत राहतात हे सूक्ष्मजीव, आता मानवी शरीराचा बनू पाहतायेत भाग; संशोधनातून धक्कादायक खुलासा

ऍसिडिटी वाढून छातीमध्ये जळजळ:

सकाळी उठल्यानंतर काहींना तोंड स्वच्छ करून चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण असे केल्यामुळे ऍसिडिटी वाढण्यासोबतच पोटात जळजळ सुद्धा होते. चहामध्ये कॅफिन आणि टॅनिन हे घटक आढळून येतात, यामुळे पोटात ॲसिड तयार होते. पोटात ॲसिडची पातळी वाढल्यानंतर छातीमध्ये जळजळ, ऍसिडिटी आणि आंबट ढेकर येण्यास सुरुवात होते. त्यामुळे कधीच उपाशी पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन करू नये.

गॅस आणि अपचन:

उपाशी पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन केल्यासमुळे गॅस आणि अपचनाच्या समस्या वाढतात. अनेकांना दिवसभरात सतत चहा पिण्याची सवय असते. वारंवार चहा प्यायल्यामुळे भूक मरून जाते आणि काहीच खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होते. ज्याचा परिणाम शरीराच्या पचनक्रियेवर लगेच दिसून येतो. गॅस, पोट फुगणे आणि अपचनाचा त्रास वाढल्यानंतर बऱ्याचदा उलट्या किंवा मळमळ सुद्धा होते. ज्यांची पचनसंस्था संवेदनशील आहे, अशांना शरीरसंबंधित अनेक त्रासांना सामोरे जावे लागते.

पोषक घटकांचे शोषण कमी होणे:

चहातील काही घटक शरीरात लोह आणि इतर आवश्यक घटक नष्ट करून टाकतात. ज्याच्या परिणामामुळे खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढून आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. वारंवार चहा पिण्याची सवय तशीच टिकून राहिल्यास शरीरातील पोषक घटकांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दिवसातून एकदा किंवा दोनदाच चहा प्यावा. जास्त चहा पिऊ नये.

Monsoon Health Tips: मुंबईमध्ये पावसाळी आजारांचा कहर! तज्ज्ञांचा ताप, डेंग्यू आणि मलेरियाबाबत गंभीर इशारा

ताण आणि हृदयाचे ठोके वाढणे:

चहामध्ये असलेल्या कॅफिनमुळे शरीराला तात्पुरती ऊर्जा मिळते. पण उपाशीपोटी जास्त प्रमाणात कॅफिन घेतल्यास घाबरल्यासारखे वाटणे, चिडचिड, तणाव आणि हृदयाचे ठोके वेगाने वाढणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे हृद्यासंबंधित आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी कमीत कमी प्रमाणात चहा किंवा कॉफीचे सेवन करावे. जास्त चहा किंवा कॉफी घेतल्यास आरोग्य बिघडू शकते.

टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra