Dailyhunt
Jio Recharge Plan: यूजर्सना धक्का! कंपनीने बंद केला हा स्वस्त प्लॅन; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

Jio Recharge Plan: यूजर्सना धक्का! कंपनीने बंद केला हा स्वस्त प्लॅन; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

  • Jio ने 22 दिवसांची व्हॅलिडिटी आणि 1GB डेटा देणारा 209 रुपयांचा प्लॅन बंद केला आहे.
  • या निर्णयामुळे यूजर्सना आता महागडे प्लॅन घ्यावे लागणार असून खर्च वाढणार आहे.
  • पर्याय म्हणून ग्राहक 249 रुपयांच्या प्लॅनकडे वळू शकतात, ज्यात 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.
देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपनी रिलायंस जियोनेत्यांच्या यूजर्सना एक मोठा धक्का दिला आहे. कंपनीने त्यांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लॅनची किंमत 209 रुपये आहे. कंपनीने हा प्रीपेड प्लॅन बंद केल्याने यूजर्स नाराज झाले आहेत. या प्लॅनमध्ये यूजर्सना 22 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह दररोज 1GB डेटा ऑफर केला जात होता. तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह रोज 100 एसएमएस देखील ऑफर केले जात होते. या प्लॅनमध्ये यूजर्सना जिओटिव्ही आणि जिओक्लाऊड सारख्या प्लॅटफॉर्मचा अ‍ॅक्सेस देखील ऑफर केला जात होता. डेली डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps होते.

Xiaomi चाहत्यांना धक्का! कंपनी 'या' फोल्डेबल फोनला करणार 'Good Bye'? कारण काय? जाणून घ्या

आता अचानक हा प्लॅन बंद करण्यात आल्याने ग्राहकांना रिचार्जसाठी जास्तीचे पैस खर्च करावे लागणार आहेत. जिओच्या या निर्णयामुळे भारतातील लाखो कमी उत्पन्न असलेल्या मोबाईल यूजर्ससाठी एक महत्त्वपूर्ण बदल घडला आहे. जे यूजर्स कंपनीच्या स्वस्त रिचार्ज प्लॅन्सवर अवलंबून आहेत, त्यांच्यासाठी कंपनीचा हा निर्णय फार धक्कादायक आहे. आतापर्यंत जे यूजर्स कंपनीचा हा प्लॅन खरेदी करत होते, त्या यूजर्सना आता दुसऱ्या प्लॅनची निवड करावी लागणार आहे. (फोटो सौजन्य - Pinterest)

यूजर्सवर कसा होणार परिणाम?

यूजर्सनी जास्त किंमतीचा प्लॅन खरेदी करावा यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या रणनितीमुळे कंपनीला प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) वाढविण्यात मदत होईल. बाजारातील तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, कंपनीला त्यांच्या ग्लोबल 5G नेटवर्क विस्तारासाठी फंड गोळा करण्याची गरज आहे. यासाठीच कंपनीने आता त्यांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन बंद केला आहे, ज्यामुळे यूजर्सना नाईलाजाने महागडे रिचार्ज प्लॅन्स खरेदी करावे लागतील. भारतीय टेलिकॉम क्षेत्रात गेल्या काही काळापासून रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवणं आणि स्वस्त प्लॅन बंद करणं अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे. भारती एयरटेल आणि वोडाफोन आइडियाने देखील अलीकडेच त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली होती.

Google I/O 2026: तारखी ठरली! या दिवशी सुरु होणार मोठा टेक ईव्हेंट, AI पासून Android पर्यंत काय असणार खास? वाचून व्हाल हैराण

ग्राहकांकडे या रिचार्ज प्लॅन्सचा पर्याय

कंपनीने त्यांचा 209 रुपयांचा प्लॅन बंद केल्यानंतर आता यूजर्स 249 रुपयांच्या प्लॅनचा विचार करू शकतात. या रिजार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. तसेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना डेला 1GB डेटाचा लाभ देखील मिळतो. ग्राहक सध्या जिओ रिचार्ज प्लॅन्सची दुसऱ्या टेलिकॉम कंपन्यांच्या रिचार्ज प्लॅनसोबत तुलना करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra