उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला कायमच दिला जातो. कारण कडाक्याच्या उन्हाळ्यात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर शरीरात खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढू लागतो.
शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर डिहायड्रेशनची समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी फ्रेश आणि कायमच ताजेतवटवीत राहण्यासाठी वेगवेगळ्या थंड पेयांचा आहारात समावेश केला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी जिंजर आईस टी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आईस टी किंवा थंड कॉफी पिण्याची इच्छा झाल्यानंतर कायमच कॅफे किंवा कोणत्याही रेस्टोरंटमधून मागवली जाते. बाजारात विकत मिळणाऱ्या आईस टी मध्ये अतिरिक्त साखर आणि रासायनिक घटकांचा सुद्धा समावेश असतो, यामुळे शारीरिक हानी पोहचू शकते. त्यामुळे नेहमीच विकतची आईस टी आणून पिण्याऐवजी घरी बनवलेली जिंजर आईस टी प्यावी. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य - istock)
सतत बटाटे खाऊन कंटाळा आला असेल तर डब्यासाठी बनवा टेस्टी रताळ्याची भाजी, झटपट तयार होईल पदार्थ
साहित्य:
- पाणी
- आलं
- ग्रीन टी किंवा ब्लॅक टी
- मध
- लिंबाचा रस
- बर्फाचे खडे
कृती:
- जिंजर आईस टी बनवण्यासाठी सर्वप्रथम, आलं पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यांच्या वरील साल काढून आल्याचे तुकडे करा.
- तुकडे करून घेतलेलं आलं किसणीच्या मदतीने किसून घ्या. टोपात एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा.
- गरम पाण्यात किसलेलं आलं टाकून ५ ते १० मिनिटं व्यवस्थित उकळवून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात ग्रीन टी किंवा ब्लॅक टी घालून पुन्हा एकदा उकळवून घ्या.
- चहाचा गॅस बंद करून तयार केलेला चहा गाळून घ्या. त्यानंतर त्यात मध आणि लिंबाचा रस एकत्र मिक्स करून घ्या.
- थंड झालेला चहा ग्लासात ओतून त्यात बर्फाचे खडे घाला आणि पिण्यासाठी सर्व्ह करा.
- तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला थंडगार जिंजर आईस टी.

