Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कडाक्याच्या उन्हाळ्यात लहान मुलांसाठी बनवा थंडगार Fruit Cream, प्रत्येक घासामध्ये मिळेल फ्रेशनेसचा खास स्वाद

कडाक्याच्या उन्हाळ्यात लहान मुलांसाठी बनवा थंडगार Fruit Cream, प्रत्येक घासामध्ये मिळेल फ्रेशनेसचा खास स्वाद

राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानात मोठी वाढ झाली आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर खूप जास्त थकल्यासारखे वाटते आणि घामामुळे अशक्तपणा वाढू लागतो. अशावेळी शरीराला थंडाव्याची खूप जास्त आवश्यकता असते.

थंड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर कायमच आईस्क्रीम किंवा थंडगार ज्यूस आणून प्यायले जाते. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांच खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही थंडगार फ्रूट क्रीम बनवू शकता. वेगवेगळी फळे आणि दूधाचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. घरातील लहान मुलांसह मोठ्यांना फळे खायला अजिबात आवडत नाही. फळांचे नाव ऐकल्यानंतर नाक मुरडले जाते. पण फळांमध्ये असलेले विटामिन सी, फायबर आणि इतर आवश्यक घटक शरीराला भरपूर पोषण देतात. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये फळांचे आवर्जून सेवन करावे. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता आणि लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी फळे खूप जास्त उपयुक्त ठरतात. चला तर जाणून घेऊया फ्रुट क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य - pinterest)

Kalakand Recipe : मऊ, तोंडात घालताच विरघळणारा हलवाई स्टाईल 'कलाकंद' घरी बनवायचाय? मग ही रेसिपी नोट करा

साहित्य:

  • फ्रेश क्रीम
  • तुमच्या आवडीनुसार फळे
  • पिठीसाखर
  • व्हॅनिला इसेन्स
  • सुका मेवा
पिझ्झा, बर्गर खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा चीझ गार्लिक ब्रेड , नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • फ्रूट क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व फळे काही वेळ पाण्यात ठेवून द्या. त्यानंतर फळांचे मध्यम आकारात तुकडे करा.
  • मोठ्या वाटीमध्ये फ्रेश क्रीम घेऊन त्यात आवडीनुसार पिठीसाखर, व्हॅनिला इसेन्स घालून विस्करने किंवा बिटरच्या मदतीने क्रीम पूर्णपणे फेटून घ्या.
  • फेटून घेतलेली क्रीम फ्रिजरमध्ये दोन ते तीन तास थंड होण्यासाठी ठेवा. यामुळे क्रीमचा थिकनेस वाढेल आणि पदार्थ सुद्धा चवीला चांगला लागेल.
  • फ्रिजमधून क्रीम काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा फेटून घ्या. त्यानंतर त्यात कापून घेतलेली फळे आणि सुका मेवा घालून मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण काहीवेळ फ्रिजमध्ये थंड करण्यासाठी ठेवा आणि नंतर सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले फ्रेश फ्रुट क्रीम. हा पदार्थ पाहून लहान मुलं खूप खुश होतील.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra