होम
कहानी मे ट्विस्ट | धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करावा; भाजच्या मागणीने दिला आश्चर्याचा धक्का

तक्रारकर्ती महिला रेणू शर्मा आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करत खळबळ उडवून देणा-या रेणू शर्मा यांच्या विरोधात आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आपला मोर्चा वळविला आहे. रेणु शर्मावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपच्या या मागणीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करत खळबळ उडवून देणा-या रेणू शर्मा यांच्या विरोधात आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आपला मोर्चा वळविला आहे. रेणु शर्मावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपच्या या मागणीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
या पूर्वी शर्मा यांच्या बाजूने असलेल्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज मुंबई पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी खोटे आरोप करणा-या रेणू शर्मावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली.
हे प्रकरण धनंजय मुंडे-रेणू शर्मा पुरते मर्यादीत नसून यामध्ये योग्य कारवाई झाली नाही तर याचे दुरगामी परीणाम राज्यातील लेकीबाळींना भोगावे लागतील यासाठी तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी केल्याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली.
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. यानंतर आता आरोप करणाऱ्या महिलेवर कारवाई व्हावी अशी मागणी भाजप करत आहे.
हे सुद्धा वाचा
- सेक्स करू शकतात पण लग्नाला अजीबात परवानगी नाही; कोर्टानेच दिला लग्न न करण्याचा निर्णय