Dailyhunt
"काले बादल" हे गाणं खास, दिग्गजांसह काम करण्याचा समृद्ध अनुभव, सांगतोय गायक अभिजीत सावंत!

"काले बादल" हे गाणं खास, दिग्गजांसह काम करण्याचा समृद्ध अनुभव, सांगतोय गायक अभिजीत सावंत!

  • प्रख्यात संगीतकार ललित पंडित यांनी गाणे केले संगीतबद्ध
  • जावेद अख्तर यांचे शब्द असलेलं ' काले बादल '
  • अभिजीत सावंतचा सुरेल आवाज, प्रेक्षकांच्या भेटीला
इंडियन आयडॉल पासून आजच्या तरुणाईला ज्याचा आवाजाची भुरळ पडतेय असा गायक अभिजीत सावंतआता पुन्हा एक नवीन हिंदी गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
आजवर त्याने अनेक सुपरहिट गाणी गायन विश्वात एक ट्रेंड सेट केला आहे.

संगीतकार जोडी जतीन-ललित मधील प्रख्यात संगीतकार ललित पंडित यांनी संगीतबद्ध केलेले आणि जावेद अख्तर यांचे शब्द असलेलं ' काले बादल ' हे गाणं अभिजीत ने सुरेल आवाजात गायलं आहे. या दिग्गज मंडळी सोबत गाणं करण्याचा अनुभव सांगताना अभिजीत सावंत सांगतो 'आजवर अनेक गाणी केली पण जेव्हा पण अश्या प्रख्यात दिग्गज मंडळी सोबत गाणं करतो तेव्हा ती एक खूप मोठी जवाबदारी असते. काले बादल करताना थोडी धाकधूक होती कारण जावेद अख्तर यांनी शब्दबद्ध केलेलं गाणं गायलं मिळणं ही देखील एक पर्वणी होती आता हे गाणं सगळ्यांचा पसंतीस उतरलं आहे हे बघून फार बरं वाटतं'

तब्बल १३ वर्षांनी अभिजीत सावंतचा मराठी चित्रपटात कमबॅक; 'सखे गं साजणी'साठी गायले टायटल ट्रॅक

अभिजीतच्या गाण्यांची पर्वणी

सर सुखाची श्रावणी, मोहब्बते लुटाऊंगा ते अगदी आता चाल तुरू तुरू , सखे गं साजणी अशा अगणित गाण्यांमधून अभिजीतच्या जादुई आवाजाने प्रेक्षक कायम मंत्रमुग्ध झाले आहेत. इथवर न थांबता अगदी आताच्या जेन झी च्या मनावर देखील त्याने अधिराज्य गाजवलं आहे. 'काले बादल' पुन्हा एकदा प्रेक्षकांना अभिजीतचा सुमधुर आवाज अनुभवयाला मिळतोय आणि तो पुन्हा चर्चेचा विषय ठरतोय. भविष्यात अभिजीत अजून बड्या प्रोजेक्ट्सचा भाग होणार असल्याचं कळतंय. अभिजीत गेले कित्येक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजनकरतोय.

अभिजीतच्या आवाजाची जादू

भारताचा पहिला इंडियन आयडॉल म्हणून मराठमोळ्या अभिजीतने मान मिळवला आणि तो आजपर्यंत टिकवून ठेवला आहे. अभिजीतची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत आणि सध्या त्याचे अनेक अल्बम बाजारात धुमाकूळ घालत आहेत. काले बादल हेदेखली त्यातलंच एक लोकप्रिय गाणं ठरतंय. आजही त्याच्या आवाजातील जादू कायम आहे आणि अभिजीतने अधिकाधिक गाणी गावीत असं त्याच्या चाहत्यांना वाटतंय. सोशल मीडियावर अभिजीत आता खूपच चांगला सक्रिय असून चाहत्यांना नक्कीच आनंद मिळतोय.

'इंडियन आयडल १' जिंकल्यानंतर का घाबरला Abhijeet Sawant ? म्हणाला, 'ते माझे आयुष्य उध्वस्त करतील..'

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra