Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कॅफे अकासाचा 'मॉन्सून स्पेशल मील' लॉन्च; पावसाळ्यातील चवींचा खास आस्वाद आता विमानप्रवासातही

कॅफे अकासाचा 'मॉन्सून स्पेशल मील' लॉन्च; पावसाळ्यातील चवींचा खास आस्वाद आता विमानप्रवासातही

कासा एअरची ऑनबोर्ड भोजन सेवा कॅफे अकासा पुन्हा एकदा प्रवाशांसाठी खास हंगामी मेनू घेऊन आली आहे. पावसाळ्याच्या स्वागतासाठी कंपनीने आपल्या 'मॉन्सून स्पेशल मील' ची चौथी आवृत्ती सादर केली असून, पारंपरिक आणि आवडीच्या पदार्थांचा अनोखा संगम या मेनूमध्ये अनुभवायला मिळणार आहे.

आरामदायी आणि पावसाळ्यात खाण्याची इच्छा होणाऱ्या पदार्थांना लक्षात घेऊन हा विशेष मेनू तयार करण्यात आला आहे. या मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असलेल्या जेवणामध्ये पोटली, चायनीज समोसे, त्यासोबत टोमॅटो साल्सा, गोडासाठी रबडीसह मालपुआ आणि आवडीचे पेय असा स्वादिष्ट मेनू समाविष्ट करण्यात आला आहे. कुरकुरीत, चविष्ट आणि पारंपरिक भारतीय गोड पदार्थांचा मिलाफ या जेवणात करण्यात आला असून, पावसाळ्याच्या आठवणींना उजाळा देणारा अनुभव प्रवाशांना मिळणार आहे.

कांद्याने नाही तर आता टोमॅटोने रडवलं, भाव पुन्हा कडाडले; काही दिवसांत 100 रुपये किलो होणार?

हे विशेष 'मॉन्सून स्पेशल मील' अकासा एअरच्या संपूर्ण नेटवर्कवर १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत उपलब्ध असणार आहे. प्रवासी हे जेवण अकासा एअरच्या अधिकृत वेबसाइट आणि मोबाईल ॲपद्वारे आगाऊ बुक करू शकतात. त्यामुळे प्रवासादरम्यान आपल्या आवडीचे हंगामी जेवण सहज उपलब्ध होणार आहे.

पावसाळा म्हटला की गरमागरम आणि चविष्ट पदार्थांची आठवण प्रत्येकाला येते. याच भावनेला अनुसरून कॅफे अकासाने हा मेनू तयार केला आहे. विमानप्रवासातही पावसाळ्यातील खास चवींचा आनंद घेता यावा, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

कॅफे अकासा वर्षभर विविध सण आणि ऋतूनुसार विशेष मर्यादित आवृत्तीचे मेनू सादर करत असते. मकरसंक्रांत, व्हॅलेंटाईन डे, होळी, ईद, इस्टर, मदर्स डे, आंतरराष्ट्रीय योग दिन, नवरोज, ओणम, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, बालदिन आणि ख्रिसमस अशा विविध सणांच्या निमित्ताने प्रवाशांसाठी खास पदार्थ उपलब्ध करून दिले जातात. तसेच विमानातच वाढदिवस किंवा इतर खास प्रसंग साजरे करण्यासाठी केक प्री-बुक करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारने कांदा खरेदी दरात केली वाढ, आता प्रति क्विंटल मिळणार तब्बल इतकी रक्कम

सध्या कॅफे अकासाच्या मेनूमध्ये ४५ हून अधिक खाद्यपदार्थांचे पर्याय उपलब्ध असून, त्यात फ्युजन मील, प्रादेशिक चवींचा समावेश असलेले स्नॅक्स, विविध प्रकारची मिठाई आणि ताजेतवाने पेये यांचा समावेश आहे. भारतातील नामांकित शेफ यांच्या मार्गदर्शनाखाली हे पदार्थ तयार करण्यात आले असून, विविध खाद्यपसंती आणि आहाराच्या गरजा लक्षात घेऊन हा मेनू विकसित करण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra