Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
काय आहे गाडीत पेट्रोल-डीझेल टाकायचं परफेक्ट टाईम? या व्हायरल गोष्टीचं सत्य जाणून घ्या

काय आहे गाडीत पेट्रोल-डीझेल टाकायचं परफेक्ट टाईम? या व्हायरल गोष्टीचं सत्य जाणून घ्या

खाती देशांमधल्या युद्धानंतरही पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ होतच आहे. यामध्येही काहीन काही पर्याय लोकांकडून शोधले जात आहेत. असाच एक जुना-पुराना नुस्खा सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे, कि जर पैसे वाचवायचे असतील तर पेट्रोल किंवा डिझेल नेहमी सकाळी-सकाळी किंवा उशिरा रात्रीच टाकायला पाहिजे. या मुद्द्यावर असं म्हणलं जातंय कि वातावरण थंड असल्या कारणाने सकाळी इंधनाची घनता जास्त असते, ज्यामुळे तेवढ्याच पैश्यांमध्ये आपल्याला थोडं जास्त पेट्रोल-डिझेल मिळून जातं.

पण काय खरोखरच असं होतं का? यामागचं सत्य जाणून घेऊयात चला..

कधी थांबणार? पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, 10 दिवसांत 7 रुपयांपेक्षा अधिक वाढ

का चुकीची आहे ही सकाळ- संध्याकाळ तेल भरण्याची थेअरी

सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या या दाव्यानुसार, दुपारच्या उन्हामुळे इंधनाची असलेली घनता कमी होते आणि सकाळच्या कमी तापमानाच्या वातावरणात वाढते. थेअरी नुसार तर हे ऐकायला बरोबरच वाटतंय; खरं पाहायला गेलं तर असं होत नाहीच. सर्व पेट्रोल पंपांवर इंधन जमिनीच्या आत मोठ्या मोठ्या टँक मध्ये साठवलेले असते. कंझ्युमर रिपोर्ट्स अनुसार हे समोर आलं आहे कि बाहेरचे तापमान कितीही बदलले तरी, जमिनीच्या खाली पेट्रोलचे तापमान 62 F म्हणजे जवळजवळ 16.6 डिग्री सेल्सियस कायम राहत. याचाच अर्थ असा कि आपण सकाळी आठ वाजता जरी पेट्रोल भरवले आणि रात्री दहा वाजता भरवले तरी, त्या पेट्रोलच्या घनतेमध्ये काही फरक पडत नाही. आपल्याला तेवढेच पेट्रोल-डिझेल मिळेल जेवढे आपल्याला सकाळ-संध्याकाळ-दुपारी भरवून मिळणार होते.

Petrol-Diesel च्या महागाईचं नो टेन्शन! आता थेट पाण्यावर धावणार कार; काय आहे नवी टेक्नॉलॉजी?

मग पैसे कसे वाचवायचे?

जर वीकेंडसाठी बाहेर जाणार असाल तर, शहराच्या आताचा टाकी फुल करून घ्या. कारण सहसा हायवे वरती पेट्रोल पंपांवर तेल महाग मिळत. आजकाल असे बरेच ऍप्प्स आले आहेत, जे स्वस्त पेट्रोल पंपांची माहिती देतात.

जेव्हाही फ्युलचा काटा 1/4वर पोहोचेल ,तेव्हा लवकर पेट्रोल भरून घ्यावे. टँक पूर्ण कोरडा झाल्यावर फयूल सिस्टमवर प्रेशर येऊन, जास्त तेल वापरले जाते, आणि फयूल फिल्टरलाही खराबी होऊ शकते.

गाडीला अचानक ब्रेक लावल्याने आणि फार जास्त स्पीड मध्ये चालवण्यानेही जास्त इंधन खर्ची होते. बरोबरच वेळोवेळी गाडीची सर्विसिंग केल्यानेही गाडीचे मायलेज चांगले राहून आपल्या पैशांची बचत होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra