भारतीय जेवणाच्या ताटातील मुख्य पदार्थ म्हणजे भात. जेवणात जर भात नसेल तर जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. कितीही चविष्ट आणि चमचमीत पदार्थ खाल्ले तरीसुद्धा भात ताटात कायमच हवा असतो. पण नेहमीच भात डाळ किंवा मसालेभात खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो.
प्रत्येकाला जेवणात काहींना काही नवीन पदार्थ हवे असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये तयार होणारा हरियाली राईस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला हरियाली राईस लहान मुलांच्या डब्यापासून ते अगदी घरी पाहुणे जेवायला आल्यानंतर सुद्धा तुम्ही बनवू शकता. हा राईस बनवताना तुम्ही त्यात वेगवेगळ्या भाज्या आणि कडधान्याचा सुद्धा वापर करू शकता. यामुळे चव चांगली लागते आणि लहान मुलं भाज्यांचे सेवन करतात. लहान मुलांना कायमच नवनवीन पदार्थ खाण्यास हवे असतात. कारण नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही वेगळी चव चाखण्याची सगळ्यांचं इच्छा होते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य - pinterest)
साहित्य:
- तांदूळ
- मिक्स भाज्या
- लाल तिखट
- खडे मसाले
- आलं लसूण मिरची पेस्ट
- कोथिंबीर
- कांदा
- टोमॅटो
- कढीपत्ता
- मीठ
- तूप
- पुदिना
कृती:
- हरियाली राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात तांदूळ घेऊन पाण्याने स्वच्छ धुवा आणि काहीवेळ पाण्यात भिजण्यासाठी ठेवा.
- मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरच्या आणि पुदिन्याची पाने घालून बारीक पेस्ट तयार करा.
- कुकरमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, जिरं आणि खडे मसाले घालून भाजा. त्यानंतर त्यात कांदा आणि टोमॅटो घालून शिजण्यासाठी ठेवा.
- कांदा लवकर शिजण्यासाठी त्यात चवीनुसार मीठ घाला. त्यानंतर त्यात तयार केलेला हिरवा मसाला घालून खमंग भाजा. मसाला भाजून झाल्यानंतर त्यात थोडीशी हळद आणि पुलाव मसाला घालून मिक्स करा.
- सर्व मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर कापून घेतलेल्या भाज्या आणि भिजवलेला तांदूळ घालून व्यवस्थित मिक्स करा.
- तांदळाच्या अंदाजाने कुकरमध्ये पाणी घालून कुकरच्या ४ शिट्ट्या काढून घ्या. झाकण खोल्यानंतर त्यावर कोथिंबीर घाला.
- तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चविष्ट हेल्दी हरियाली राईस.

