Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Khamenei Funeral : 'रक्ताचा बदला घेऊ', खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?

Khamenei Funeral : 'रक्ताचा बदला घेऊ', खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?

  • खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा
  • अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडणार?
  • काय म्हणाला इराण?
Khamenei Funeral : अमेरिका आणि इराणमध्ये ६० दिवसांचा युद्धविराम लागू आहे. परंतु दोन्ही देशांतील तणाव निवळण्याचे नाव घेईना.
इराणने माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी अमेरिकेला कडक इशारा दिला आहे. तसेच अमेरिकेसोबतची चर्चा सध्या नाकारली आहे.

US Iran Negotiations : ५७,००० कोटींची मालमत्ता इराणला परत मिळणार? दोहामधील अमेरिका-इराण चर्चा यशस्वी

दोन्ही देशांतील युद्ध थांबले असले तरी मतभेद कायम आहेत. दोहा येथे शांतता आणि अणु कार्यक्रमावर कतार-पाकिस्तानच्या मध्यस्थीने चर्चा होणार होती. पण इराणने अमेरिकेलसोबतच खामेनेईंच्या अंत्यसंस्कार होईपर्यंत कोणतीही चर्चा करणार नसल्याचे म्हटले आहे. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहम्मद बाकर झोलकद्र यांनी या संदर्भात एक संदेश जारी केला आहे. या संदेशानुसार, अयातुल्ला खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला आम्ही निश्चित घेऊ असे म्हटले आहे.

खामेनेईंचा अमेरिका-इस्रायली हल्ल्यात मृत्यू

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने इराणनविरोधात संयुक्त लष्कीर मोहिम सुरु केली होती. यामध्ये इस्रायलने इराणवर भीषण हल्ले केले होते. या हल्ल्यात अयातुल्ली अली खामेनेई यांचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर मध्यपूर्वेत युद्धाने पेट घेतला. या हल्ल्यात इराणचे अनेक वरिष्ठ अधिकारीही ठार झाले होते.

सध्या खामेनेईंच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम ४ ते ८ जुलैगरम्यान आयोजति करण्यात आला आहे. यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी इराणी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. खामेनेई यांचे निधन इराणसाठी शेवट नसून नव्या अध्यायाची सुरुवात आहे, असे त्यांनी म्हटले.

चर्चेला इराणचा नकार

दुसरीकडे इराणने अमेरिका जोपर्यंत दोन्ही देशांतील MoU करारांतील अटी पूर्ण करत नाही तोपर्यंत कोणतीही थेट चर्चा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच इराणने लेबनॉनमधून इस्रायली सैन्य माघारी घेतल्याशिवाय पुढील वाटाघाटी चर्चा सुरु होणार नाहीत असेही सांगितले आहे. सध्या दोहामध्ये केवळ अप्रत्यक्ष चर्चा सुरु आहे. इराणी अधिकाऱ्यांनी थेट अमेरिकन अधिकाऱ्यांची भेट देण्यास नकार दिला आहे.

इराणची जप्त संपत्ती परत मिळणार?

दुसरीकडे इराणचे उपपरराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या चर्चेत इराणच्या ६ अब्ज डॉलरच्या म्हणजे ५७ हजार कोटींच्या जप्त केलेल्या मालमत्तेबद्दल चर्चा झाली. ही मालमत्ता इराणला टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे. परंतु अमेरिकेकडून यावर अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

Thailand Accident : थायलंडमध्ये भीषण अपघात! अल्पवयीन मुलाने यात्रेकरुंच्या अंगावर चढवला ट्रक; ८ बौद्ध भिक्षूंचा दुर्दैवी मृत्यू

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra