Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
किया इंडियाची ऐतिहासिक कामगिरी! जून महिन्यात २४,५५२ गाड्यांची विक्री करत नोंदवला नवा उच्चांक

किया इंडियाची ऐतिहासिक कामगिरी! जून महिन्यात २४,५५२ गाड्यांची विक्री करत नोंदवला नवा उच्चांक

भारतीय वाहन बाजारात आपला दबदबा कायम राखत किया इंडियाने जून २०२६ मध्ये विक्रीचा एक नवा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. कंपनीने या महिन्यात २४,५५२ गाड्यांची होलसेल विक्री केली असून, कियाने भारतात पाऊल ठेवल्यापासूनची जून महिन्यातील ही आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी ठरली आहे.

गेल्या वर्षी म्हणजेच जून २०२५ मध्ये कंपनीने २०,६२५ गाड्यांची विक्री केली होती. त्या तुलनेत यंदा कंपनीच्या विक्रीत तब्बल १९ टक्क्यांची उल्लेखनीय वार्षिक वाढ झाली आहे.

पहिल्या सहामाहीतही विक्रमी विक्री

फक्त जून महिनाच नव्हे, तर २०२६ या कॅलेंडर वर्षाची पहिली सहामाही देखील किया इंडियासाठी अत्यंत फायदेशीर ठरली आहे. या पहिल्या सहा महिन्यांत कंपनीने एकूण १,६३,७४९ वाहनांची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा १,४२,१३९ इतका होता. म्हणजेच कंपनीने पहिल्या सहामाहीत १५.२ टक्क्यांची दमदार वृद्धी नोंदवली आहे.

कियाचा मोठा धमाका! कियाच्या ३ नवीन एसयूव्ही लवकरच येणार मार्केटमध्ये!

सेल्टोसआणि सोनेटठरल्या गेमचेंजर

कियाच्या या यशात ‘किया सेल्टोस’ आणि ‘किया सोनेट’ या मॉडेल्सचा सिंहचा वाटा आहे. मध्यम आकाराच्या एसयूव्ही प्रकारात सेल्टोसची मागणी प्रचंड आहे. तिचे अद्ययावत डिझाईन, प्रगत फीचर्स, प्रीमियम तंत्रज्ञान आणि ‘भारत NCAP’ कडून मिळालेले ५-स्टार सेफ्टी रेटिंग यामुळे ग्राहकांनी या गाडीला पसंती दिली आहे. विशेष म्हणजे, कियाचे जुने ग्राहकही आता नव्या सेल्टोसकडे आकर्षित होत आहेत. तर दुसरीकडे, कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारात ‘सोनेट’ने आपली मजबूत पकड कायम ठेवत कंपनीच्या विक्रीचा आलेख उंचावला आहे. याशिवाय Carens Clavis, MY2026 Syros आणि Clavis EV यांसारख्या मॉडेल्सना मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे कंपनीला हा टप्पा गाठता आला.

किया इंडियाकडून प्रोजेक्ट 'डी.आर.ओ.पी'च्या फेज-४ ची सुरुवात; शाश्वत विकास आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाला नवी गती

नेटवर्कचा विस्तार

ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कियाने भारतात आपले जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारले आहे. सध्या देशातील ४०७ शहरांमध्ये कंपनीचे ८९२ टचपॉइंट्स (शोरूम्स आणि्ह सर्विस सेंटर्स) कार्यरत आहेत. तसेच, कंपनीच्या अधिकृत ‘प्री-ओन्ड’ कार व्यवसायाचे १३३ आउटलेट्स सुरू झाले आहेत, ज्यामुळे जुन्या गाड्यांची खरेदी-विक्री आणि एक्सचेंज करणे सोपे झाले आहे.

या यशाबद्दल बोलताना किया इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सेल्स आणि मार्केटिंग अतुल सूद म्हणाले, “वर्षाची पहिली सहामाही ऐतिहासिक विक्रीसह पूर्ण करणे हा किया इंडियासाठी एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. हा पराक्रम ग्राहकांचा आमच्या ब्रँडवरील अढळ विश्वास दर्शवतो. नवीन सेल्टोस, सोनेट आणि केरेन्स क्लॅव्हिसच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे आणि माय२६ सायरसला मिळालेल्या उत्कृष्ट प्रतिसादामुळेच आम्ही हे यश मिळवू शकलो आहोत.”

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra