Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
किया इंडियाकडून प्रोजेक्ट 'डी.आर.ओ.पी'च्या फेज-४ ची सुरुवात; शाश्वत विकास आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाला नवी गती

किया इंडियाकडून प्रोजेक्ट 'डी.आर.ओ.पी'च्या फेज-४ ची सुरुवात; शाश्वत विकास आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाला नवी गती

मुंबई, १४ जून २०२६: किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम कार उत्पादक कंपनीने शाश्वत विकास आणि पर्यावरणाविषयीच्या जबाबदार भूमिकेप्रती असलेल्या आपल्या दीर्घकालीन कटिबद्धतेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे.

इंडियन पोल्युशन कंट्रोल असोसिएशन (आयपीसीए) आणि नवी दिल्ली म्‍युनिसिपल कौन्सिल (एनडीएमसी) यांच्या सहयोगाने कंपनीने आज नवी दिल्लीतील कनॉट प्लेस येथील एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासाठी प्रोजेक्ट डी.आर.ओ.पी.च्या (डेव्‍हलप रिस्‍पॉन्सिबल आऊटलुक फॉर प्‍लास्टिक) फेज-४ ची घोषणा केली.

या फेज-४ अंतर्गत प्रोजेक्ट डी.आर.ओ.पी.चा दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादमधील २५० केंद्रांवर प्लास्टिक कचऱ्याचे जबाबदार व्यवस्थापन सुलभ करण्‍याचा मनसुबा आहे, ज्यामुळे अधिक स्वच्छ आणि शाश्वत शहरी परिसंस्था निर्माण करण्याच्या या उपक्रमाचे योगदान अधिक दृढ होईल.

Creta आणि Seltos ला टक्कर देण्यासाठी सज्ज Nissan Tekton; प्रीमियम फीचर्सने ग्राहकांना भुरळ घालणार

फेज-४ च्‍या शुभारंभाचा भाग म्हणून, किया इंडिया आणि त्यांच्या भागीदारांनी रिसायकल केलेल्या प्लास्टिक कचऱ्याचा वापर करून तयार केलेल्या विशेष डी.आर.ओ.पी. कम्युनिटी बीन्सचे (कचरा कुंड्यांचे) अनावरण केले. यातून संसाधनांच्या पुनर्वापरावर या प्रकल्पाचा असलेला भर अधोरेखित होतो. या इव्‍हेण्‍टमध्‍ये डी.आर.ओ.पी. कलेक्‍शन वेईकलला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले, जे नवी दिल्लीमध्ये प्लास्टिक कचऱ्याचे वर्गीकरण, संकलन आणि जबाबदार विल्हेवाट लावण्याची पद्धत अधिक दृढ करण्यासाठी एका पद्धतशीर आणि एकात्मिक कचरा संकलन यंत्रणेच्या अंमलबजावणीचे प्रतीक आहे.

प्रोजेक्ट डी.आर.ओ.पी.च्या फेज-४ च्‍या शुभारंभाबद्दल मत व्‍यक्त करत किया इंडियाचे सेल्स आणि मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष अतुल सूद म्हणाले, "भारतातील शहरी परिसंस्था विकसित होत आहे, तसे पद्धतशीर आणि शाश्वत कचरा व्यवस्थापन प्रणालीची गरज पूर्वीपेक्षा अधिक गंभीर बनली आहे. प्रोजेक्ट डी.आर.ओ.पी.च्या माध्यमातून, किया इंडिया व्‍यक्तींच्‍या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि जबाबदार प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी प्रत्‍यक्ष मजबूत पायाभूत सुविधांना साहाय्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हा उपक्रम आणण्यासाठी आणि देशभरात व्यापक पर्यावरणीय परिवर्तनाला प्रेरित करू शकणारे अनुकरणीय मॉडेल तयार करण्यासाठी आम्हाला आयपीसीए आणि एनडीएमसीसोबत सहयोग करण्याचा अभिमान वाटत आहे."

Kia India : किया इंडिया आणि टेनिस प्रीमियर लीगची मोठी भागीदारी; भारतातील टेनिसला मिळणार नवी चालना

किया इंडियाने २०२३ मध्ये पाच शहरांमध्ये प्रोजेक्ट डी.आर.ओ.पी. सुरू केला होता आणि ५०० केंद्रांमधून २,५०० टन प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे आपले उद्दिष्ट पूर्ण केले होते. २०२४ मध्ये, या उपक्रमाचा ७८९ केंद्रांवर विस्तार करण्यात आला आणि ३,५०० टनांचे उद्दिष्ट ओलांडून ४,८५० टन कचरा गोळा करण्यात आला. २०२५ मध्ये, या उपक्रमाची व्याप्ती चंदीगड, पंचकुला आणि झिरकपूरसह आठ शहरांमध्ये वाढवण्यात आली, ज्यामध्ये १,१०० केंद्रांमधून एकूण १४,५६० मेट्रिक टनपेक्षा जास्त प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात आले आणि या उपक्रमाचा ३६ लाखांहून अधिक व्‍यक्तींवर सकारात्मक प्रभाव पडला. आता त्याच्या चौथ्या टप्प्यात, प्रोजेक्ट डी.आर.ओ.पी. चा ११ शहरांमध्ये विस्तार केला जात असून त्यात १,३५० केंद्रांचा समावेश आहे आणि कचरा संकलनाचे उद्दिष्ट वाढवून ९,२०० टन करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra