- किया इंडियाने इटलीच्या ‘सोरेन्टो’ शहराचा टीझर शेअर करत येणाऱ्या फ्लॅगशिप SUV च्या नावाची घोषणा केली आहे.
- या गाडीत १.६L टर्बो पेट्रोल हायब्रिड इंजिनसह ५, ६ आणि ७-सीटर लेआउट पर्याय मिळतील.
- भारतात ही प्रीमियम कार असेंबल करून लाँच केली जाईल आणि स्कोडा कोडियाकशी थेट स्पर्धा करेल.
किया इंडियाने आपल्या नव्या फ्लॅगशिप SUV ‘किया सोरेंटो’च्या भारतातील आगमनाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. कंपनीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका टीझरमध्ये इटलीच्या ‘सोरेन्टो’ शहराची झलक दाखवली आहे, ज्यामुळे हे आगामी मॉडेल सोरेंटोच असेल यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही अधिकृत डीलरशिप्सवर या गाडीची अनधिकृत बुकिंगही सुरू झाली असून, पुढील काही आठवड्यांत ही कार अधिकृतपणे लाँच होण्याची शक्यता आहे.
पावरफुल हायब्रिड इंजिन आणि परफॉर्मन्स
भारतीय बाजारात ही SUV कियाची फ्लॅगशिप ICE इंटरनल कम्बशन इंजिन SUV म्हणून ओळखली जाईल. यात स्ट्रॉंग हायब्रिड पेट्रोल इंजिन मिळण्याची दाट शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या गाडीमध्ये १.६-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल हायब्रिड इंजिन दिले जाते, जे २३८ hp ची कमाल पॉवर आणि ३८० Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. जागतिक स्तरावर ही गाडी फ्रंट-व्हील-ड्राइव्ह आणि ऑल-व्हील-ड्राइव्ह अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, मात्र भारतात कोणता पर्याय दिला जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पाच सहा आणि सात सीटरचे पर्याय
किया सोरेंटोचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे केबिन आणि सीटींग लेआउट. ही प्रीमियम SUV ५-सीटर, ६-सीटर आणि ७-सीटर अशा तीन वेगवेगळ्या सीटींग पर्यायांमध्ये सादर केली जाऊ शकते. जर असे झाले, तर आपल्या सेगमेंटमध्ये तीनही सीटींग पर्याय देणारी ही एकमेव SUV ठरेल.
आकार आणि डिझाइन
ही SUV गेल्या काही महिन्यांपासून भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान अनेकदा दिसून आली आहे.
- लांबी: ४,८१५ मिमी
- रुंदी: १,९०० मिमी
- उंची: १,७०० मिमी
- व्हीलबेस: २,८१५ मिमी
१९८० च्या दशकातील 'या' ५ भन्नाट कॉन्सेप्ट कार्स; ज्या रस्त्यावर उतरल्या असत्या तर इतिहास घडला असता!
हाय-टेक केबिन आणि फीचर्स
इंटरनॅशनल मॉडेलप्रमाणेच भारतीय मॉडेलमध्येही अनेक प्रीमियम फीचर्स पाहायला मिळतील:
- ड्युअल स्क्रीन सेटअप: १२.३-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि १२.३-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम.
- आरामदायी फीचर्स: पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॉवर्ड ड्रायव्हर सीट.
- सुरक्षा: ३६०-डिग्री कॅमेरा, वायरलेस कनेक्टिव्हिटी आणि लेव्हल-२ ADAS (अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) तंत्रज्ञान.
किया सोरेंटो ही गाडी भारतात CKD (Completely Knocked Down) म्हणजेच असेंबल करून विक्रीसाठी आणली जाण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात लाँच झाल्यानंतर या कारची थेट स्पर्धा स्कोडा कोडियाक आणि फॉक्सवॅगन टायरोन यांसारख्या प्रीमियम SUVs शी होईल.

