Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कियाचा मोठा धमाका! कियाच्या ३ नवीन एसयूव्ही लवकरच येणार मार्केटमध्ये!

कियाचा मोठा धमाका! कियाच्या ३ नवीन एसयूव्ही लवकरच येणार मार्केटमध्ये!

किया कंपनीने २०२६ च्या ‘इन्व्हेस्टर डे’ दरम्यान भारतीय बाजारपेठेसाठी आपल्या दीर्घकालीन योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार, कंपनी २०३० पर्यंत १० नवीन मॉडेल्स बाजारात आणणार आहे, ज्यामध्ये ८ इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांचा समावेश असेल.

तसेच, वर्षाला ४ लाखांपेक्षा जास्त वाहने विकण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. दरम्यान, दक्षिण कोरियन कार उत्पादक कंपनी ‘टाटा नेक्सॉन इव्ही’ आणि ‘महिंद्रा एक्सयुव्ही ३एक्सओ इव्ही’ ला टक्कर देण्यासाठी ‘किया सायरॉस इव्ही’ लाँच करण्याच्या तयारीत आहे.

किया सायरॉस इव्ही (Kia Syros EV)

‘के१’ प्लॅटफॉर्मवर आधारित असणारी ही कार भारतातील कियाची सर्वात लहान आणि सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार असेल. पेट्रोल-डिझेल मॉडेलप्रमाणेच हिचा आकारही बॉक्ससारखा आणि उंच असेल. मात्र, नवीन ग्रील, बदललेले बंपर, एरो-ऑप्टिमाइझ्ड अलॉय व्हील्स आणि ‘इव्ही’ बॅज यांमुळे ती नेहमीच्या मॉडेलपेक्षा वेगळी दिसेल. कारच्या अंतर्गत भागातही काही इलेक्ट्रिक-विशिष्ट बदल पाहायला मिळतील.

किया इंडियाकडून प्रोजेक्ट 'डी.आर.ओ.पी'च्या फेज-४ ची सुरुवात; शाश्वत विकास आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाला नवी गती

या कारच्या बॅटरी आणि मोटरची अधिकृत माहिती लाँचच्या वेळीच समोर येईल, तरीही यामध्ये ‘ह्युंडाई इन्स्टर इव्ही’ प्रमाणेच ४२ किलोवॅट-अवर आणि ४९ किलोवॅट-अवरचे बॅटरी पॅक्स मिळण्याची शक्यता आहे. किंमतीचा विचार केला तर, या नवीन इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या बेस व्हेरिएंटची किंमत सुमारे १५ लाख रुपये आणि टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत जवळपास २० लाख रुपयांपर्यंत असण्याचा अंदाज आहे.

आगामी किया हायब्रिड एसयूव्ही (Kia Hybrid SUVs)

‘सायरॉस इव्ही’च्या लाँचिंगनंतर, किया कंपनी हायब्रिड कारच्या क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. यामध्ये ‘किया सोरेन्टो’ ही तीन ओळींची ७-सीटर प्रीमियम एसयूव्ही आणि ‘किया सेल्टॉस हायब्रिड’चा समावेश असेल. रिपोर्टनुसार, भारतातील या दोन्ही हायब्रिड कार्समध्ये १.५ लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनचे इलेक्ट्रिफाइड व्हर्जन वापरले जाऊ शकते.

फक्त 1 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट देऊन घरी आणा Kia Sonet चे ऑटोमॅटिक व्हेरिअंट! किती असेल दरमहा EMI? समजून घ्या संपूर्ण गणित

माहितीसाठी, युरोपमध्ये उपलब्ध असलेल्या ‘किया सोरेन्टो’मध्ये १.६ लीटर, ४-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि ६-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो. तिथे या एसयूव्हीच्या सर्व व्हेरिएंट्समध्ये ऑल-व्हील ड्राईव्ह स्टँडर्ड म्हणून दिले जाते.

भारतात लाँच झाल्यावर ‘किया सोरेन्टो हायब्रिड’ कार ‘स्कोडा कोडिएक’, ‘फॉक्सवॅगन टायरॉन आर-लाईन’ आणि ‘जीप मेरिटियन’ या गाड्यांना टक्कर देईल. हिची किंमत ३० लाख ते ३५ लाख रुपयांच्या दरम्यान असण्याचा अंदाज आहे. तसेच, आगामी ‘किया सेल्टॉस हायब्रिड’ची किंमतही सध्याच्या पेट्रोल-डिझेल मॉडेलपेक्षा जास्त असेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra