Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Kokan Railway कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! CSMT ते सावंतवाडी रोड नियमित एक्सप्रेसला मंजुरी; पर्यटन, व्यापाऱ्यांना मोठा दिलासा

Kokan Railway कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! CSMT ते सावंतवाडी रोड नियमित एक्सप्रेसला मंजुरी; पर्यटन, व्यापाऱ्यांना मोठा दिलासा

  • मुंबई-सावंतवाडी दरम्यान नवी दैनिक एक्सप्रेस
  • कोकण रेल्वेला मोठी भेट
  • श्रीकांत शिंदे-नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश
  • पर्यटन, व्यापार आणि प्रवाशांना मोठा दिलासा
Kokan Railway News Marathi : भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे ( Kokan Railway) मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कोकणातील प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे.

खासदारांच्या पाठपुराव्याला यश

कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी कोकण रेल्वेवरील नवीन गाडी सुरू करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. दोन दिवसांपूर्वीही खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी पुन्हा मांडली होती. अखेर भारतीय रेल्वेने या मागणीला मंजुरी दिली असून यासंदर्भातील घोषणा केंद्र सरकारच्या PIB संकेतस्थळावर करण्यात आली आहे.

कोंकणवासियांसाठी आनंदाची बातमी! आता 'या' मोठ्या स्थानकावर ३ महत्त्वाच्या ट्रेन्स थांबणार; मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

दररोज धावणार नवी एक्सप्रेस

प्रस्तावित रेल्वेगाडी क्रमांक 15087 (CSMT-सावंतवाडी रोड एक्सप्रेस) आणि क्रमांक 15088 (सावंतवाडी रोड-CSMT एक्सप्रेस) या नावाने दररोज धावणार आहे. या रेल्वेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

महत्त्वाचे थांबे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड

पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना

सुमारे 510 किलोमीटर अंतरावरील या नवीन रेल्वे सेवेमुळे मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणातील प्रमुख शहरांमध्ये थेट रेल्वे संपर्क निर्माण होणार आहे. कोकणातील समुद्रकिनारे, किल्ले, धार्मिक स्थळे आणि निसर्ग पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल. याशिवाय विद्यार्थी, व्यापारी, नोकरी करणारे आणि दैनंदिन प्रवाशांसाठी प्रवास अधिक सुलभ होणार असून स्थानिक व्यापार, पर्यटन उद्योग आणि प्रादेशिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल.

प्रादेशिक विकासाला गती

खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले की, कोकण रेल्वे मार्गावरील वाढती प्रवासी मागणी लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ही एक्सप्रेस सेवा केवळ प्रवासी सुविधांमध्ये वाढ करणार नाही, तर संतुलित प्रादेशिक विकास, रोजगाराच्या संधी आणि आर्थिक प्रगतीलाही चालना देणारी ठरणार आहे.

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra