Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कोकणातील पारंपरिक पदार्थ! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी बनवा कुळीथाची पिठलं, पचनक्रिया राहील मजबूत

कोकणातील पारंपरिक पदार्थ! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी बनवा कुळीथाची पिठलं, पचनक्रिया राहील मजबूत

कोकणातील प्रत्येक घरात अतिशय आवडीने कुळीथ पिठापासून बनवलेली पिठी किंवा पिठलं खाल्लेले जाते. हा पदार्थ कोकणकरांच्या अतिशय जिव्हाळयाचा आहे. गरमागरम भात किंवा भाकरीसोबत कुळीथ पिठाची पिठी अतिशय सुंदर लागते.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि इतरही ग्रामीण भागात हा पदार्थ अतिशय आवडीने बनवून खाल्ला जातो. जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर अनेक घरांमध्ये डाळ बनवण्याऐवजी भातासोबत खाण्यासाठी पिठी बनवली जाते. पारंपरिक आणि पौष्टिक चवीच्या पदार्थाचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारते. पावसाळ्यात कुळीथपासून बनवलेले सूप किंवा इतर पौष्टिक पदार्थ खाल्ल्यास शरीरात उष्णता कायम टिकून राहते आणि पचनक्रिया बिघडत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इतर कोणतेही तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी कुळीथ पिठापासून बनवलेले पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये तयार होणारे कुळीथ पिठाचे पिठलं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा मस्त लागते. जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Recipe : कुरकुरीत नूडल्स, आंबट-गोड सॉस आणि भरपूर भाज्या; रेस्टाॅरंट स्टाईल 'अमेरिकन चाॅप्सी'ची रेसिपी नोट करा

साहित्य:

  • कुळीथ पीठ
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • कोकम
  • लाल तिखट
  • लसूण
  • हळद
  • मोहरी
  • तेल
Party Snacks : तुम्ही कधी 'दही के शोले खाल्ले' आहेत का? आजच नोट करा रेसिपी

कृती:

  • कुळीथ पिठाचे पिठलं बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये पीठ घेऊन त्यात थोडस पाणी घालून मिक्स करा. पीठ मिक्स करताना त्यात अजिबात गुठळ्या ठेवू नये.
  • पिठलं बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि ठेचून घेतलेला लसूण घालून लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून लालसर होईपर्यंत भाजून घ्या. कांद्यात चवीनुसार मीठ घाला. यामुळे मऊ होण्यास मदत होईल.
  • भाजलेल्या कांद्यात लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा आणि तयार केलेली कुळीथ पिठाचे मिश्रण ओतून मिक्स करा.
  • चमच्याने सतत मिक्स करत राहा. यामुळे पिठलं बनवताना गुठळ्या होणार नाहीत. पिठी मंद आचेवर शिजल्यानंतर ओल्या खोबऱ्याचा किस आणि कोकम घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले कुळीथ पिठाचे पिठलं. हा पदार्थ गरमागरम खाल्ल्यास चव अतिशय भारी लागेल.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra