Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कोलमाइन्स प्रकल्पावर हरकतींचा भडीमार, नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे तक्रार

कोलमाइन्स प्रकल्पावर हरकतींचा भडीमार, नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे तक्रार

साखरा, (वा.) : झरी तालुक्यातील मार्की-झरी जामणी-अडकोली कोलमाइन्स प्रकल्पासंदर्भात पर्यावरण जनसुनावणीपूर्वी विविध मुद्द्यांवर गंभीर हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर करून प्रकल्पातील अनेक बाबींची सखोल चौकशी करूनच पर्यावरणीय मंजुरी द्यावी, अशी मागणी केली आहे.

या प्रकल्पामुळे परिसरातील शेती, जंगल, जलस्रोत, वन्यजीव, जैवविविधता, पर्यावरण तसेच स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. प्रस्तावित कोळसा खाण प्रकल्पासाठी आवश्यक असलेली संपूर्ण माहिती ग्रामस्थांसमोर पारदर्शकपणे मांडण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

६०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, ५१ हजार ग्राहकांकडे १२.३२ कोटींची महावितरणची थकबाकी

झरी तालुक्यातील प्रस्तावित मार्की-झरी जामणी-अडकोली कोलमाईन्स प्रकल्पासंदर्भात जनसुनावणीपूर्वी विविध मुद्द्यांवर गंभीर हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. विजय पिदूरकर यांनी जनसुनावणीदरम्यान ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करून, चुकीची अथवा अपूर्ण माहिती असल्यास त्यामध्ये दुरुस्ती करूनच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी मंडळाकडे केली आहे.

Bhandara: ३०० कोटींच्या उड्डाणपुलाला ३ वर्षांत गळती; पिलरमधून वाहतेय पाणी, महामार्ग प्राधिकरणाचा कारभार

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra