Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'काँग्रेसचे विरोधी पक्षाचे स्थान संपुष्टात येण्याच्या मार्गावर'; भाजप आमदाराची टीका

'काँग्रेसचे विरोधी पक्षाचे स्थान संपुष्टात येण्याच्या मार्गावर'; भाजप आमदाराची टीका

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच आता भाजपआमदार परिणय फुके यांनी काँग्रेसवर टीका केली.

‘काँग्रेसपेक्षा कॉकरोच जनता पार्टीने इतके मोठे आंदोलन उभे केले आहे. काँग्रेस पक्षामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. विरोधी पक्षाची स्पेस संपुष्टात येत आहे. देशात छोटे-छोटे मुद्दे कॉकरोच, आम आदमी पार्टी उचलत आहे. काँग्रेसमध्ये असुरक्षिततेचे वातावरण असल्याचे फुके यांनी म्हटले आहे.

परिणय फुके यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेल्या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीतून ही योजना राबवली जाणार आहे. बाकीच्या योजना या केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहेत. दोन्ही सरकारांच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत. नमो सन्मान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या पैशांवर कुठलीही कात्री लागणार नाही’.

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! 'या' घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान Manmohan Singh यांना क्लीन चिट; काय होते प्रकरण?

संजय राऊत राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले की, ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशी गत संजय राऊत यांची आहे. दुसऱ्यांच्या आंदोलनावर वक्तव्य करणे हे संजय राऊत यांचे कामच झाले आहे. पुण्यामध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार अजित डोवाल यांना मिळणार आहे. त्याला विरोध होण्याचे काहीच कारण नाही. काहीतरी माध्यमांसमोर बोलण्यासाठी छोट्या-मोठ्या संघटना समोर येत आहेत. अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका केली आहे.

काँग्रेसपेक्षा सीजेपीचे मोठं आंदोलन

अभिजित दीपके कृष्णाच्या अवतार असतील, तर उद्धव ठाकरे हे कंसाच्या अवतार आहेत, असा भास त्यांना होत असेल. सध्या अभिजित दीपके यांच्या मामाची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. काँग्रेसपेक्षा कॉकरोच जनता पार्टीने इतके मोठे आंदोलन उभे केले आहे. काँग्रेस पक्षामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. विरोधी पक्षाची स्पेस संपुष्टात येत आहे. देशात छोटे-छोटे मुद्दे कॉकरोच, आम आदमी पार्टी उचलत आहे. काँग्रेसमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे, असेही फुके यांनी म्हटले आहे.

Supreme Court News : मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीतून सरन्यायाधीशांना का वगळण्यात आले?: सर्वोच्च न्यायालय

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra