महाराष्ट्र
कोरोनाची दुसरी लाट... | राज्यात कोरोनाचा धोका वाढतोय, ९ हजार ८५५ इतक्या नव्या रूग्णांची नोंद

राज्यात आज ४२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज नाेंद झालेल्या ४२ मृत्युपैकी ३२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७ मृत्यु हे मागील अाठवड्यातील आहेत. उर्वरित ३ मृत्यु हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३ मृत्यु नागपूर-२ आणि उस्मानाबाद -१ असे आहेत. आज ६,५५९ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत.
मुंबई : राज्यात ९,८५५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या २१,७९,१८५ झाली आहे. राज्यात ८२,३४३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ४२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५२,२८० वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४० टक्के एवढा आहे.
राज्यात आज ४२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज नाेंद झालेल्या ४२ मृत्युपैकी ३२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७ मृत्यु हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ३ मृत्यु हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३ मृत्यु नागपूर-२ आणि उस्मानाबाद-१ असे आहेत.
आज ६,५५९ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत.
हे सुद्धा वाचा
राज्यात आजपर्यंत एकूण २०,४३,३४९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.७७ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६५,०९,५०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,७९,१८५ (१३.२० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,६०,५०० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,७०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.