Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कुत्राही आहे कमांडो! सैनिक साथिदारांच्या जोडीला श्वानाने हेलिकाॅप्टरमधून मारली उडी, आकाशातील थरारक दृष्य कॅमेरात कैद; Video Viral

कुत्राही आहे कमांडो! सैनिक साथिदारांच्या जोडीला श्वानाने हेलिकाॅप्टरमधून मारली उडी, आकाशातील थरारक दृष्य कॅमेरात कैद; Video Viral

  • लष्करी श्वानाने सैनिकांसोबत आकाशातून उडी घेत धाडस दाखवले
  • विशेष प्रशिक्षणामुळे तो कोणत्याही परिस्थितीत शांत राहून काम करताना दिसला
  • व्हिडिओ पाहून यूजर्सनी श्वानाच्या शौर्याचे कौतुक केले
देशाच्या रक्षणासाठी जसे सैनिकांची भरती केली जाते. या टीममध्ये काही श्वानांचाही समावेश होतो. कुत्र्याला सर्वात निष्ठावान प्राणी मानले जाते. आपल्या मालकाला सुरक्षित ठेवण्यासाठी ते स्वत:चा जीव देखील धोक्यात घालतात. हेच कारण आहे की अनेक घरांंमध्ये सुरक्षेसाठी कुत्र्याला पाळले जाते. याचप्रमाणे सैनिकांच्या टीममध्ये देखील काही श्वानांची भरती केली जाते. त्यांना ट्रेन केलं जातं ज्यामुळे देशाच्या संरक्षणात त्याची बरीच मदत होते. अशात अलिकडेच एक श्वानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे ज्यात तो सैनिक साथिदारांसोबत हेलिकाॅप्टपरमधून आकाशात उडी मारताना दिसला. श्वानाच्या अतुलनीय शौर्याने सर्वांना थक्क केलं आणि यूजर्सने यावर आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

"बंद करा युद्ध", व्यक्तीने भल्यामोठ्या पुलावर चढून अमेरिका-इराण युद्धाचा केला निषेध; सोशल मिडियावर Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

इंटरनेटवर व्हायरलहोत असलेल्या या व्हिडिओत सैनिकांची एक तुकडी हेलिकाॅप्टरच्या मदतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. यावेळी त्यांच्यासोबत लष्करी कुत्रा देखील असतो. जसे त्यांचे गंतव्यस्थान येते तसे एक एक सैनिक पॅराॅशूटच्या मदतीने आकाशात झेप घेत जमिनीवर लँडींग करु लागतात. याचवेळी त्यांच्यासोबत असलेला श्वान देखील हजारो फूड उंचावरुन सैनिकाच्या सोबतच आकाशात झेप घेतो. यावेळी तो घाबरत नाही आणि आपल्या सैनिक मित्राला सहकार्य करतो. श्वानाचे हे धाडस आता यूजर्सना चांगलेच थक्क करत आहे. हा व्हिडिओ कझाकस्तानमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. कुत्र्याचे नाव अरिशा असे होते आणि तो प्रशिक्षकासोबत विमानातून पॅराशूटने खाली उतरत होता. हा श्वानाच्या प्रशिक्षणाचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे.

भररस्त्यात संतापजनक प्रकार! धावत्या दुचाकीवर महिलेला अमानुष मारहाण; नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त, Video Viral

हे लक्षात घेतले पाहिजे की, विशेष दलातील कुत्र्यांना अनेक कठीण मोहिमांसाठी तयार केले जाते आणि त्यांना असे प्रगत प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून ते सर्व परिस्थितीत आपल्या टीमसोबत काम करू शकतील. हा व्हिडिओ @gdnonline नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या श्वानाच्या या कर्तबाविषयी आपले मत व्यक्त केला आहे. यात एका यूजरने म्हटले की, "अरे व्वा… त्याचा आत्मविश्वास आणि शांतपणा तर अविश्वसनीय आहे… तो इतका निवांत आहे की, जणू काही कामावरचा एखादा नेहमीसारखाच कंटाळवाणा दिवस आहे!", दुसऱ्या युजरने लिहिले आहे, "खरोखरच अप्रतिम" आणखीन एका युजरने लिहिले आहे, "आश्चर्यकारक आहे की तो घाबरला नाही".

टीप - हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra