Dailyhunt
Ladki Bahin Yojana: दोन महिने उलटले, पण हप्ता नाहीच; लाभार्थी महिलांचा सरकारविरोधात संताप

Ladki Bahin Yojana: दोन महिने उलटले, पण हप्ता नाहीच; लाभार्थी महिलांचा सरकारविरोधात संताप

  • दोन महिने उलटले, पण हप्ता नाहीच
  • लाभार्थी महिलांचा सरकारविरोधात संताप
पैठण (वा.) राज्य सरकारची गाजलेली ‘लाडकी बहीण’ योजना (Ladki Bahin Yojana) सध्या पैठणसह जिल्ह्यामध्ये अक्षरशः ठप्प झाल्याचे चित्र आहे.
मार्च आणि एप्रिल असे सलग दोन महिने उलटूनही लाभार्थी महिलांच्या खात्यात हफ्ता जमा न झाल्याने महिलांमध्ये नाराजी तसेच संताप उफाळून आला आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल या आशेवर अनेक महिलांनी लग्न समारंभतसेच घरखर्चाचे नियोजन केले होते. परंतु सलग दोन महिन्यांपासून शासनाकडून पैसे मिळाले नसल्याने या महिलांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. विशेषतः गरीब व गरजू महिलांसाठी ही योजना आधार ठरली आहे. मात्र दोन महिन्यांपासून हफ्ता न मिळाल्याने गरजू महिला अडचणीत सापडल्या आहेत.

दरम्यान, शासनाने केवायसी प्रक्रिया अनिवार्य केल्यामुळे महिलांची अधिकच गैरसोय होत आहे. प्रलंबित हफ्ता नेमका केव्हा मिळणार, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही. त्यामुळे महिलांचे लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

तुम्हीही 'लाडकी बहिणी'तून चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले? तर आता वसूली झाली सुरु, तब्बल 11 कोटी…

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी शासनाने पुढील अटी लागू केल्या आहेत त्यात लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावे, बँक खाते आधारशी संलग्न असणे बंधनकारक, केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक एका कुटुंबातील मर्यादित लाभार्थीनाच लाभ शासकीय कर्मचारी व आयकरदाते अपात्र मात्र, या सर्व अटी पूर्ण करूनही प्रत्यक्षात लाभ मिळत नसल्याने “नियम कडक, पण सेवा ढिसाळ” अशी टीका होत आहे.

तातडीने दखल घेण्याची मागणी

लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. आता पाच वर्षे ग्रामपंचायत वगळता स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुख्य निवडणुका होणार नाहीत. परिणामी शासनाकडून आता लाडकी बहीण योजनेकडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा सध्या महिलांमध्ये रंगली आहे. राज्य सरकारने महिलांच्या खात्यात तत्काळ पंधराशे रूपये जमा करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra