Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लग्न कर नाहीतर., तिने लग्नाला नकार दिला, बाॅयफ्रेंडने गर्लफ्रेंडचा गळा आवळत मृतदेहाला जिवंत जाळले; मध्य प्रदेशातील घटना

लग्न कर नाहीतर., तिने लग्नाला नकार दिला, बाॅयफ्रेंडने गर्लफ्रेंडचा गळा आवळत मृतदेहाला जिवंत जाळले; मध्य प्रदेशातील घटना

  • तरुणीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला; सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला.
  • पोस्टमार्टम आणि फॉरेन्सिक तपासात हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.
  • सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयिताला अटक करून पुढील कारवाई सुरू केली.
मागील काही काळापासून प्रियकर-प्रेयसीच्या हत्याकांडाचे प्रकार फार जास्त वाढत चालले आहे. नात्यातील मदभेद विकोपाला जातात आणि संताप हाताबाहेर गेला की सामान्य व्यक्तीचे गुन्हेगारात रुपांतर व्हायला वेळ लागत नाही. ही घटना मध्य प्रदेशच्या इंदूरमधील खजराना परिसरातून समोर येत आहे. २६ जुलै रोजी तपेश्वरी बाग कॉलोनीत भाड्याने राहणाऱ्या पलक काशिवचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. तरुणी बँकेत काम करत असून सुरुवातीला ही घटना अनेकांना आत्महत्या असल्याचे वाटले. परंतु पोलिसांनी मृतदेहाला रुग्णालयात पाठवताच पोस्टमार्टम रिपोर्टमधून खरं सत्य बाहेर आलं.

Palghar crime: ₹32 कोटींसाठी पार्टनरच्या हत्येची सुपारी; उद्योगपतीवर जीवघेणा हल्ला, 7 आरोपी अटकेत

मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन महिन्यांपासून पलक आपल्या कुटुंबाच्या संपर्कात नव्हती. खोलीतील संपूर्ण प्रकार पाहता तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय प्राथमिक तपासात आला. परंतु पोस्टमार्टमसाठी पलकचा मृतदेह रुग्णालयात पाठवताच वेगळंच सत्य बाहेर आलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तरुणीचा सर्वात आधी गळा दाबण्यात आला होता आणि मग तिच्या मृतदेहाला आग लावण्यात आली. इथूनच प्रकरणाला नवे वळण प्राप्त झाले आणि पोलिसांनी आपला तपास सुरु केला.

खजराना पोलिसांनी एफएसएलच्या मदतीने घटनास्थळावरुन सर्व पुरावे गोळा केले. आजूबाजूला लावलेले सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि या तपासादरम्यानच त्यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण पेट्रोलचा डब्बा घेऊन जाताना दिसला. यावरुन पोलिसांनी तरुणाचा तपास सुरु केला आणि ग्वालियरच्या डबरा येथील रहिवाशी मयंकला संशयाच्या आधारावर ताब्यात घेतलं. पोलिसांच्या माहितीनुसार, मागील पाच वर्षांपासून मयंक पलकचा जवळचा मित्र होता. घटना घडली त्या दिवशी दोघेही एकमेकांना भेटले आणि त्यांच्यात विवाहावरुन वाद सुरु झाला. मयंकने पलकला लग्नासाठी विचारले असता पलकने लग्नाला थेट नकार दिला. या नकारानंतर मयंक संतापला आणि रागाच्या भरात त्याने कथितरित्या पलकचा गळा आवळून तिची हत्या केली. यानंतर मृतदेहावर पेट्रोल टाकून त्याने आग लावली. हे हत्येच नाही तर आत्महत्येचं प्रकरण आहे अस खोट कारण त्याला भासवायचं होतं आणि यामुळेच त्याने पलकच्या मृतदेहाला आग लावली.

मरण स्वस्त होतेय? वाहनचालकांचा बेशिस्तपणा; पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू

इंदूर पोलिसांच्या मते, खुनाचे पुरावे नष्ट करणे आणि तपासाची दिशा भरकटवणे हा आरोपीचा हेतू होता. परंतु पोस्टमार्टम रिपोर्ट्स, फॉरेन्सिक सायन्सची तपासणी आणि सीसीटीव्ही फुटेजने त्याचा कथित कट उघडकीस आणला. सर्व पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी आरोपी मयंकला अटक केली असून हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या कलमांखाली त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra