Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत मोठा ट्विस्ट? ही लोकप्रिय अभिनेत्री घेणार एक्झिट; हे आहे कारण

'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत मोठा ट्विस्ट? ही लोकप्रिय अभिनेत्री घेणार एक्झिट; हे आहे कारण

  • रम्याची भूमिका साकारणारी कश्मिरा कुलकर्णी मालिकेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगली आहे.
  • अभिनेत्रीच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी सर्जरीचा सल्ला दिला आहे.
  • सध्या शूटिंग मर्यादित हालचालींसह सुरू असून गरज पडल्यास ती काही काळ ब्रेक घेणार आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये आता एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या मालीकेतील एक लोकप्रिय अभिनेत्री आता एक्झिट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. याचं कारण देखील अभिनेत्रीने स्वत: सांगितलं आहे. मात्र यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही अभिनेत्री कोण आहे आणि मालिकेतून अचानक एक्झिट घेण्याचं कारण काय आहे, याबाबत जाणून घेऊया.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मध्ये मोठा ट्विस्ट! 18 वर्षांनंतर बापूजींचा मृत्यू? जेठालालचा आक्रोश, प्रोमोने उडवली खळबळ

'लग्नानंतर होईलच प्रेम' या स्टार प्रवाहावरील मालिकेने अत्यंत कमी कालावधी घराघरात लोकप्रियता मिळवली. या मालिकेला आणि मालिकेतील प्रत्येक कलाकाराला अत्यंत कमी वेळात प्रेक्षकांची पसंती मिळाली. जिवा व नंदिनी आणि काव्या आणि पार्थ यांच्या आयुष्यात येणारे नवनवीन ट्विस्ट पाहताना प्रेक्षकांना देखील मजा येत आहे. याशिवाय रम्या आणि विजय यांची नवीन जोडी काव्यार्थ आणि जीवांदिनी यांच्या आयुष्यात कोणते मोठे वादळ आणणार याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच असते. मालिकेत नवनवीन ट्विस्ट येत असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेतील एक लोकप्रिय अभिनेत्री आता एक्झिट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. (फोटो सौजन्य - instagram)

'लग्नानंतर होईलच प्रेम' या स्टार प्रवाहावरील मालिकेत रम्याचे पात्र साकारून अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी हिने महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रियता मिळवली आहे. कश्मिरा कुलकर्णीने साकारलेल्या रम्या या भूमिकेला देखील प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. पार्थला मिळवण्यासाठी रम्याची सुरु असलेली धडपड आणि तिचा रागीट स्वभाव प्रेक्षकांना देखील तितकाच आवडत आहे. जिवा व नंदिनी आणि काव्या आणि पार्थ यांच्या आयुष्यात सतत संकट यावी, यासाठी रम्या नेहमीच नवीन कट रचत असते. तिच्या प्रत्येक कारस्थानाला प्रेकक्षांचा प्रतिसाद उत्तम मिळतो. पण आता असं सांगितलं जात आहे की, रम्या म्हणजेच अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी मालिकेतून एक्झिट घेणार आहे.

अभिनेत्री कश्मिरा हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे डॉक्टरांनी कश्मिराला सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे. याच कारणामुळे आता कश्मिरा 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत आता चर्चा देखील सुरु झाली आहे. यावर एका मुलाखतीत कश्मिराने काय सांगितलं जाणून घेऊया.

मंसूर खान आणि आमिरची जोडी पुन्हा 'लाईमलाईट'मध्ये; 'कयामत से कयामत तक'च्या आठवणींमध्ये 'Ek Din'चा ग्रँड प्रीमियर

अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी म्हणाली आहे की, माझ्या पायाला एसिअल कट आहे. डॉक्टरांनी मला सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे. या सर्वाबाबत जेव्हा माझ्या टिमला समजलं, सर्वचजण माझी खूप काळजी घेत आहेत. मला केवळ बसून किंवा उभं राहून डायलॉग्स दिले जात आहे, ज्यामुळे मला जास्त हालचाल करावी लागू नये. मी पुन्हा एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे. यानंतर गरज असल्यास मी काही काळ ब्रेक घेईन.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra