Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लज्जास्पद! कॅब चालकांची अरेरावी! ५२२ चा प्रवास ११५० रुपयांत? Pune Airport वरील प्रकरण काय?

लज्जास्पद! कॅब चालकांची अरेरावी! ५२२ चा प्रवास ११५० रुपयांत? Pune Airport वरील प्रकरण काय?

  • पुणे विमानतळावर कॅबचालकांची मनमानी कायम
  • सोशल मीडियावरील पोस्टमुळे प्रकार उघड
  • अ‍ॅपवर ५२२ रुपये, प्रत्यक्षात १,१५० रुपये वसूल
पुणे: पुणे विमानतळावरून शहरात जाणाऱ्या प्रवाशांकडून अ‍ॅपवर दर्शविलेल्या भाड्यापेक्षा अधिक रक्कम वसूल करण्याच्या तक्रारी पुन्हा एकदा समोर आल्या आहे.
विमानतळ ते वाकड या प्रवासासाठी अ‍ॅपवर ५२२ रुपये भाडे दाखविण्यात आले असताना संबंधित कॅबचालकाने प्रवाशाकडून यूपीआयद्वारे तब्बल १,१५० रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.प्रवाशाने (RTO) अ‍ॅपवरील भाड्याचा स्क्रीनशॉट आणि यूपीआय व्यवहाराचा पुरावा सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा प्रकार चर्चेत आला.

२७ जुलै रोजी संबंधित प्रवाशाने पुणे विमानतळावरून वाकडकडे जाण्यासाठी अ‍ॅपच्या माध्यमातून कॅब बुक केली होती. प्रवास सुरू होण्यापूर्वी अ‍ॅपवर ५२२ रुपये भाडे निश्चित झाले होते. मात्र, प्रवास संपल्यानंतर चालकाने १,१५० रुपये भाडे झाल्याचे सांगत ती रक्कम यूपीआयद्वारे स्वीकारल्याचा दावा प्रवाशाने केला आहे.याबाबत ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तातडीने कोणतीही मदत मिळाली नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

प्रवाशांसाठी खुशखबर! Pune Airport वरून 'या' मार्गांवर सुरू होणार उड्डाणे

पुणे विमानतळावर दररोज २०० हून अधिक विमानांची ये-जा होत असून सुमारे ३३ ते ३५ हजार प्रवासी प्रवास करतात.प्रवाशांच्या सुविधेसाठी एरोमॉलमार्फत कॅब सेवा उपलब्ध करून देण्यात आली असली, तरी या सेवेबाबत जादा भाडे आकारणे, अ‍ॅपवरील बुकिंग रद्द करण्यास भाग पाडणे, रोख अथवा अ‍ॅपबाहेरील व्यवहारासाठी दबाव टाकणे अशा तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.

प्रवाशांनी संबंधित कॅब कंपन्यांनी अशा चालकांवर कठोर कारवाई करावी, अ‍ॅपबाहेरील व्यवहारांना आळा घालावा आणि तक्रारींचे त्वरित निवारण करणारी प्रभावी यंत्रणा उभी करावी,अशी मागणी केली आहे. वारंवार तक्रारी होत असतानाही संबंधित यंत्रणा आणि विमानतळ प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याबद्दल प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

'RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT मार्फत होणार चौकशी'; मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT चौकशी

विधानसभेत RTO विभागातील भ्रष्टाचार, बेकायदेशीर वसुली, करचुकवेगिरी आणि नोंदणी प्रक्रियेतील अनियमितता या मुद्द्यांवर जोरदार चर्चा झाली. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी RTO विभागात मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांची नावे घेत त्यांच्या ऑडिओ क्लिप्स सभागृहात मांडल्या. विधानसभेत प्रश्नोत्तर काळात वडेट्टीवार यांनी RTO विभागातील रॅकेट आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा पर्दाफाश केला. नागपूर RTO मध्ये चोरीच्या वाहनांच्या नोंदणीसह मोठ्या गैरव्यवहारांचा आरोपही त्यांनी केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra