Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Lipstick Side Effects: दररोज लिपस्टिक लावल्याने ओठ खरंच कोरडे होतात का? जाणून घ्या सत्य

Lipstick Side Effects: दररोज लिपस्टिक लावल्याने ओठ खरंच कोरडे होतात का? जाणून घ्या सत्य

  • लिपस्टिक लावल्याने ओठ खरंच कोरडे होतात का
  • ओठ कोरडे पडण्याची इतर प्रमुख कारणे
  • लिपस्टिक वापरताना घ्यावयाची काळजी
लिपस्टिक हा मेकअपमधील सर्वाधिक वापरला जाणारा ब्युटी प्रोडक्ट आहे. मात्र, “लिपस्टिक लावल्यामुळे ओठ काळे किंवा कोरडे होतात” असा समज आहे.
परंतु, ओठ कोरडे पडण्यामागे केवळ लिपस्टिक कारणीभूत नसते. हवामानातील बदल, शरीरातील पाण्याची कमतरता, वारंवार ओठांवर चीभ फिरवण्याची सवय किंवा काही घटकांची ॲलर्जी यांसारखी अनेक कारणे यामागे असू शकतात. त्यामुळे लिपस्टिक वापरताना योग्य प्रोडक्टची निवड आणि ओठांची योग्य काळजी घेणे अधिक गरजेचे आहे.

Fenugreek seeds water: वजन कमी ते ब्लड शुगर कंट्रोल, मेथीच्या पाण्याचे जबरदस्त फायदे; जाणून घ्या पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत

लिपस्टिकमुळे ओठ कोरडे का वाटू शकतात?

विशेषतः मॅट किंवा दीर्घकाळ टिकणाऱ्या लिपस्टिक कमी मॉइश्चरायझिंग असू शकतो. त्यामुळे काही व्यक्तींना ओठ ताणल्यासारखे किंवा कोरडे वाटू शकतात. मात्र, याचा अर्थ प्रत्येक लिपस्टिकमुळे ओठ कोरडे होतात असे नाही. मॉइश्चरायझिंग घटक असलेली लिपस्टिक किंवा लिप बामचा वापर केल्यास हा त्रास टाळता येऊ शकतो.

ओठ कोरडे पडण्याची इतर प्रमुख कारणे

  • दिवसभर पुरेसे पाणी न पिणे.
  • कोरडे किंवा थंड हवामान.
  • वारंवार ओठांवर जीभ फिरवण्याची सवय.
  • शरीरात काही जीवनसत्त्वांची कमतरता.
  • ब्युटी प्रोडक्ट्समधील विशिष्ट रसायनांमुळे होणारी ॲलर्जी.

लिपस्टिक वापरताना घ्यावयाची काळजी

  • नेहमी चांगल्या क्वालिटीची आणि ब्रँडची लिपस्टिक वापरा.
  • लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप बाम लावा.
  • प्रोडक्टची एक्सपायरी डेट तपासण्यास विसरू नका.
  • इतरांची लिपस्टिक वापरणे टाळा.
  • दिवसाच्या शेवटी लिपस्टिक पूर्णपणे स्वच्छ करून काढा.

कधी घ्यावा तज्ज्ञांचा सल्ला"text-align: justify;" class="bullet-text">लिपस्टिक वापरल्यानंतर ओठांवर सतत खाज, जळजळ, सूज, त्वचा सोलणे किंवा भेगा पडणे यांसारखी लक्षणे दिसत असतील, तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

ओठ निरोगी ठेवण्यासाठी या सवयी अंगीकारा

लिपस्टिक वापरण्यासोबतच ओठांची नियमित काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दिवसभर पुरेसे पाणी प्या, आठवड्यातून एक-दोन वेळा सौम्य स्क्रबने मृत त्वचा काढा आणि दररोज रात्री पौष्टिक लिप बाम लावा. सूर्यप्रकाशात बाहेर पडताना एसपीएफयुक्त लिप बाम वापरल्यास ओठांचे संरक्षण होते. संतुलित आहार आणि पुरेशी झोपही ओठांना नैसर्गिक मऊपणा टिकवून ठेवण्यास मदत करतात.

Malaria: पावसाळ्यात वाढतो मलेरियाचा धोका; लहान मुलांवर सर्वाधिक परिणाम, जाणून घ्या सुरुवातीची लक्षणे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra