Thursday, 21 Jan, 4.56 pm नवराष्ट्र

होम
महाराष्ट्र | सरकारला अंधारात ठेवून सुप्रीम कोर्टात परस्पर दाखल केलेली याचिका MPSC मागे घेणार

मुंबई : एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांची निवड रद्द करावी अशी याचिका एमपीएससीने (MPSC) सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. एमपीएससीने सरकारला अंधारात ठेवून परस्पर घेतलेल्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. यानंतर एमपीएससीने सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयातील याचिका मागे घेण्याचे निर्देश MPSC ने आपल्या वकिलांना दिले आहेत.

मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकार सतत प्रयत्न करीत असताना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानेच (एमपीएससी) सर्वोच्च न्यायालयात परस्पर अर्ज दाखल करत सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गातंर्गत २०१८ पासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टात केली होती. तसेच नव्याने निकाल जाहीर करण्याचीही मागणी केली . या मुद्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत संतापाचा सूर निघाला होता. या प्रकाराविरोधात सर्वत्र मंत्र्यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवला होता. परंतु आता एमपीएससीने वकिलांना ही याचिका मागे घेण्यास सांगितलं आहे.

कुणी जाणीवपूर्वक केले आहे की काही वेगळ्या विचारांनी केले आहे हे लवकरच समोर येईल : अजित पवार

हे कुणी जाणीवपूर्वक केले आहे की काही वेगळ्या विचारांनी केले आहे हे लवकरच समोर येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीने मराठा विद्यार्थ्यांसंदर्भात जी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली त्यासंदर्भात बोलताना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी जनता दरबार उपक्रमास उपस्थित होते त्यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra
Top