Dailyhunt
Maharashtra 1st Conclave 2026: विचारांपासून ध्येयपूर्तीपर्यंत, पायाभूत सुविधा आणि उद्योगांसाठी जागतिक पातळीवरील नवा उपक्रम

Maharashtra 1st Conclave 2026: विचारांपासून ध्येयपूर्तीपर्यंत, पायाभूत सुविधा आणि उद्योगांसाठी जागतिक पातळीवरील नवा उपक्रम

  • आता महाराष्ट्राचं भविष्य तुमच्या हाती;
  • The Magnetic Maharashtra ,
  • पायाभूत सुविधा आणि उद्योगांसाठी जागतिक पातळीवरील नवा उपक्रम
कोणत्याही उच्च दर्जाचं काम करण्यासाठी महत्वाचे असतात ते विचार आणि दृष्टीकोन.
आजवर पुरोगामी महाराष्ट्राला व्यवसाय, राजकारण आणि अन्य विविध क्षेत्रातील वारसा लाभलेला आहे. याच महाराष्ट्राला आता जागतिक पातळीवरील महत्वाचं केंद्र बनवण्याची आता वेळ आली आहे. याचपार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी पुन्हा एकदा मोठ्या व्हिजन आणि जागतिक गुंतवणुकीची साक्षीदार ठरणार आहे. नवभारत मीडिया ग्रुपच्या महाराष्ट्र 1st कॉन्क्लेव 2026 अंतर्गत The Magnetic Maharashtra च्या 4th Edition चे भव्य आयोजन मंगळवार, 19 मे रोजी ताज प्रेसिडेंट, कफ परेड, मुंबई येथे पार पडणार आहे.

“Magnetic Maharashtra – Where Growth Attracts the World” या संकल्पनेवर आधारित हा कॉन्क्लेव महाराष्ट्राच्या त्या प्रगतीची झलक दाखवतो, ज्यामुळे महाराष्ट्र एक जागतिक केंद्र बनले आहे. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राने पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स आणि उद्योग क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. मागील आवृत्त्यांच्या यशामुळे हे स्पष्ट झाले आहे की, हा मंच केवळ चर्चेपुरता मर्यादित नसून ठोस धोरणात्मक बदल आणि गुंतवणूक करारांचे प्रभावी व्यासपीठ आहे. महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्दिष्टाकडे वेगाने नेणे, हा या कॉन्क्लेवचा मुख्य हेतू आहे.

दिग्गजांची उपस्थिती ठरणार आकर्षण

या कॉन्क्लेवमध्ये सरकारच्या विविध विभागांसह देशातील मोठ्या कॉर्पोरेट समूहांचा सहभाग पाहायला मिळणार आहे. यामध्ये DGIPR, MMRDA, MSRDC, Maharail, Mahavitran, Genco, Film City, CIDCO, Adani, Tunwal Motors Pvt Ltd, D Y Patil Group Kolhapur, MIDC, DOT, MSIDC, MSRTC, NSDL, IOCL, MPCB, MahaIT, Kalyan CTB (Late Gangadhar Gade) Group यांसारख्या नामांकित संस्थांचा समावेश आहे.

याशिवाय, महाराष्ट्र सरकारचे अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मंत्री जयकुमार रावल यांच्यासह विविध विभागांचे नेतृत्व राज्याच्या नव्या धोरणांवर चर्चा करणार आहे.


मागील कार्यक्रमात संवाद, धोरणात्मक चर्चा आणि प्रभावी सहकार्यांनी महाराष्ट्राच्या विकास प्रवासाला नवी दिशा दिली. या व्यासपीठाने उद्योगविश्व, धोरणकर्ते आणि दूरदर्शी नेतृत्वाला एकत्र आणत महाराष्ट्राला जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनवण्याच्या दृष्टिकोनाला अधिक बळ दिले. आता वेळ आली आहे ती महाराष्ट्राला जागतिक पातळीवरील गुंतवणूकीचं क्रेंद म्हणून ओळख देण्याची. मराठी उद्योगकांसाठी आणि मराठी व्य़वसायांसाठी एकत्र येण्याचा हाच तो ऐतिहासिक क्षण. आता हा प्रवास पुढील टप्प्याकडे वाटचाल करत आहे.या ऐतिहासिक प्रवासाचा अनुभव घ्या, त्याचा प्रभाव अनुभवा आणि भविष्यातील महाराष्ट्रासाठी सज्ज व्हा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra