Maharashtra to National And International Breaking News:
Arvind Kejriwal E20 Petrol: E20 पेट्रोलवरून केंद्र सरकारचा वाहन कंपन्यांवर दबाव;अरविंद केजरीवाल यांचा गंभीर आरोप
नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांकडून पेट्रोलमधील २० टक्के इथेनॉलच्या (E20) ब्लेंडिंगचे जोरदार समर्थन केले जात आहे.
दुसरीकडे या इंधनामुळे जुन्या गाड्यांच्या इंजिनचे नुकसान होत असल्याच्या तक्रारींवरून सोशल मीडियावर ‘E20 जनता पार्टी’ स्थापन करत व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे.याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि नवी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.केंद्र सरकारच्या दबावामुळेच वाहन उत्पादक कंपन्या २०२३ पूर्वीच्या गाड्यांसाठी ई-२० पेट्रोल सुरक्षित आहे की नाही, याबाबत सार्वजनिकपणे सत्य सांगायला घाबरत असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे.

