Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Maharashtra Breaking News Updates Today:  पुणे आणि साताऱ्याला आज 'ऑरेंज अलर्ट'

Maharashtra Breaking News Updates Today: पुणे आणि साताऱ्याला आज 'ऑरेंज अलर्ट'

Maharashtra to National And International Breaking News:

राज्यात बाईक-टॅक्सीचा परवाना मिळवण्यासाठी यापुढे महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करण्यात आले आहे. याचा अर्थ, जे मूळ महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, त्यांनाच आता बाईक-टॅक्सी चालवता येईल.

याशिवाय, बाईक-टॅक्सी चालवणाऱ्यांना मराठी भाषा येणेही बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात वाढलेली अनधिकृत वाहतूक, महिलांच्या सुरक्षेचा निर्माण झालेला प्रश्न आणि परप्रांतीय चालकांचा वाढता सहभाग या सर्व गंभीर बाबींची दखल घेत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत राज्य सरकारची ही नवीन नियमावली आणि भूमिका स्पष्ट केली.

विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची ओळख, कागदपत्रांची पडताळणी निश्चित करण्यासाठी नियमावलीत आवश्यक बदल करण्यात येत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra