Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि  देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार निकाल; ‘असा’ पाहा रिझल्ट

पुणे | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

२०२६ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, २ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने प्रसिद्ध केला जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची आणि पालकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

निकालाच्या दिवशी सकाळी ११ वाजता शिक्षण मंडळाची अधिकृत पत्रकार परिषद पार पडणार असून, यामध्ये राज्याचा एकूण निकाल आणि इतर सांख्यिकीय माहिती दिली जाईल. त्यानंतर दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर आपला वैयक्तिक निकाल पाहता येईल. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा आसन क्रमांक (Seat Number) आणि आईचे नाव अर्जातील नोंदीप्रमाणे प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

विद्यार्थी आपला निकाल mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतील. यासोबतच इतर काही अधिकृत पोर्टलवरही निकालाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यंदाची परीक्षा दिलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्या स्पष्ट होणार असून, निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच गुणपत्रिका डाउनलोड करण्याची सोयही उपलब्ध असेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra