Saturday, 06 Mar, 8.00 am नवराष्ट्र

ताज्या बातम्या
#महिलादिन | पर्वणी : जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी नवी मुंबईतील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये चित्रपटाचा मोफत शो; पार्किंग शुल्कही नाही

ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये संपूर्ण मार्च महिना जागतिक महिला दिन आणि होळीनिमित्त 'रंगोवाली खुशियाँ' हा खास उपक्रम राबवला जाणार आहे. या खास उपक्रमामध्ये आम्ही महिलांना जे काही देऊ करणार आहोत, त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनातून त्यांना थोडा तरी विरंगुळा मिळेल, असा आमचा प्रयत्न आहे, असं सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलचे व्यवस्थापक राहिल नसीर अज्जानी यांनी सांगितलं.

    नवी मुंबई : सीवूडची ओळख म्हणून उदयाला आलेल्या ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये महिलांना जागतिक महिला दिनी खास भेट मिळणार आहे. या मॉलमध्ये महिलांना ८ मार्च रोजी चित्रपट फुकटात दाखवले जाणार आहेत. त्याशिवाय 'रंगोवाली खुशियाँ' या मॉलच्या नव्या उपक्रमाअंतर्गत ५ मार्चपासून ८ मार्चपर्यंत महिलांना पार्किंगसाठीही शुल्क भरावं लागणार नाही.

    ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये संपूर्ण मार्च महिना जागतिक महिला दिन आणि होळीनिमित्त 'रंगोवाली खुशियाँ' हा खास उपक्रम राबवला जाणार आहे. या खास उपक्रमामध्ये आम्ही महिलांना जे काही देऊ करणार आहोत, त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनातून त्यांना थोडा तरी विरंगुळा मिळेल, असा आमचा प्रयत्न आहे, असं सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलचे व्यवस्थापक राहिल नसीर अज्जानी यांनी सांगितलं.

    या उपक्रमात सिनेपोलीस चित्रपटगृहदेखील सहभागी झालं आहे. या चित्रपटगृहात ८ मार्च रोजी 'केऑस वॉकिंग' या चित्रपटाचा शो महिलांना विनाशुल्क दाखवला जाणार आहे. त्याशिवाय खरेदीसाठी आलेल्या महिलांनाही फक्त २५०० रुपयांच्या किमान खरेदीवर काही भेटवस्तू किंवा सवलती देण्यात येणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra
Top