Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Malaria: पावसाळ्यात वाढतो मलेरियाचा धोका; लहान मुलांवर सर्वाधिक परिणाम, जाणून घ्या सुरुवातीची लक्षणे

Malaria: पावसाळ्यात वाढतो मलेरियाचा धोका; लहान मुलांवर सर्वाधिक परिणाम, जाणून घ्या सुरुवातीची लक्षणे

  • पावसाळ्यात वाढतो मलेरियाचा धोका
  • लहान मुलांवर सर्वाधिक परिणाम
  • जाणून घ्या सुरुवातीची लक्षणे

पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांची संख्या झपाट्याने वाढते आणि त्यासोबतच मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका अधिक वाढतो.

हा आजार कोणालाही होऊ शकतो, मात्र लहान मुलांसाठी तो विशेषतः धोकादायक ठरू शकतो. मुलांची प्रतिकारशक्ती प्रौढांच्या तुलनेत कमी असल्याने संसर्गाचा परिणाम अधिक गंभीर होण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी मलेरियाची सुरुवातीची लक्षणे ओळखून योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. मलेरियाची सुरुवातीची लक्षणे कोणती, जाणून घ्या.

Health Tips: जेवणानंतर चहा पिण्याची सवय आहे का? आरोग्यासाठी ठरू शकते घातक; 'हे' परिणाम एकदा वाचाच

लहान मुलांना धोका अधिक का असतो?

विशेषतः पाच वर्षांखालील मुलांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे डासांद्वारे पसरणाऱ्या मलेरियाच्या परजीवीचा संसर्ग झाल्यास त्यांचे शरीर त्याला प्रभावीपणे तोंड देऊ शकत नाही. कुपोषण, अस्वच्छ परिसर, घराजवळ साचलेले पाणी आणि डासांची वाढलेली संख्या यामुळे संसर्गाचा धोका आणखी वाढतो.

मलेरियाची सुरुवातीची लक्षणे कशी ओळखाल?

सुरुवातीला मलेरियाची लक्षणे साध्या तापासारखी वाटू शकतात. वारंवार किंवा तीव्र ताप येणे, थंडी वाजणे, अंगदुखी, डोकेदुखी, जास्त घाम येणे आणि अशक्तपणा जाणवणे ही सामान्य लक्षणे आहेत. लहान मुलांमध्ये दूध किंवा अन्न खाण्यास नकार देणे, सतत रडणे, चिडचिड करणे, खेळण्यात रस कमी होणे किंवा अत्यंत सुस्ती दिसणे ही देखील मलेरियाची संकेत असू शकतात.

उपचारात विलंब जीवावर बेतेल?

वेळीच उपचार न मिळाल्यास मलेरिया गंभीर वाढू शकतो. काही प्रकरणांमध्ये झटके येणे, रक्तातील हिमोग्लोबिन कमी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे तसेच मेंदू, यकृत किंवा मूत्रपिंडावर परिणाम होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे ताप कायम राहिल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

  • घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका.
  • मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करायला लावा.
  • झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.
  • डासांपासून बचावासाठी सुरक्षित रिपेलंटचा वापर करा.
  • ताप, थंडी किंवा इतर संशयास्पद लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • घर आणि परिसर स्वच्छ ठेवा.
टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Monsoon Hair Care: पावसात भिजल्यानंतर केसांची काळजी कशी घ्यावी? 'या' सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra