Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
माणुसकी अजून जिवंत आहे! धावत्या ट्रेनसमोर आडवी आली म्हैस; शेवटच्या क्षणी लोको पायलटनं जे केलं., पाहा काय घडलं? Video Viral

माणुसकी अजून जिवंत आहे! धावत्या ट्रेनसमोर आडवी आली म्हैस; शेवटच्या क्षणी लोको पायलटनं जे केलं., पाहा काय घडलं? Video Viral

  • धावत्या ट्रेनसमोर आडवी आली म्हैस..
  • शेवटच्या क्षणी लोक पायलटनं जे केलं
  • पाहा काय घडलं?
Loco Pilot Stops Train to Save Buffalo : सोशल मीडिया अलकीडे मनोरंजनाचे उत्तम प्लॅटफॉर्म बनले आहे.
इथे कधी तुम्हाला काय पाहायला मिळेल सांगत येत नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र घटनांचे व्हिडिओ पाहायला मिळतात. भांडण, स्टंटबाजी यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. सध्या एक माणुसकीचा प्रत्यय देणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ थेट लोकांच्या मनाला भिडला आहे. एका लोको पायलटने ट्रेनसमोर म्हैस आल्यावर जे कृत्य केलं आहे त्याने सर्वांचे मन जिंकले आहे. सध्या या लोको पायलटचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Election Results Memes : निवडणुकांवर मीम्सचा पाऊस; बंगाल आणि तामिळनाडू सर्वाधिक चर्चेत

नेमकं का घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन वेगाने धावत आहे. याच वेळी प्लॅटफॉर्मवर दोन म्हैस उभ्या आहेत. यातील एक म्हैस ट्रेनचा आवाज ऐकताच पळून जाते. लोको पायलट सतत ट्रेनचा हॉर्न वाजवत असतो. पण एक ट्रेन रुळावरच उभी असते. हे पाहून लोकोपायलट ट्रेन थांबवतो. तातडीने खाली उतरुन ट्रॅकवर पळत जाऊन म्हशीला बाजूला करतो. तुम्ही पाहू शकता लोको पायलटने म्हशीपासून काही अंतरावर ट्रेन थांबवलेली आहे. लोकोपायलटच्या या कृत्याने सर्वांचे मन जिंकले आहे. ट्रॅक खाली केल्यावर लोकोपायलट पुढे गेला आहे.

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Dineshkjoshi007 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी लोको पायलटच्या कृत्याचे कौतुक केले आहे. ग्रामीण भागांमध्ये ट्रॅकवर प्राणी अपघाताच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. परंतु लोको पायटच्या माणुसकीने म्हशीचा जीव वाचला असून लोक त्याची वाहवाह करत आहेत. हा व्हिडिओ थेट लोकांच्या मनाला भिडला आहे.

प्रॅंक पडला महागात! AI फोटो शेअर केल्याने संपूर्ण शहरात लॉकडाऊन; आता तरुणाला खावी लागणार जेलची हवा?

टीप - हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra