Dailyhunt
मराठीची बाराखडी; 'आशीर्वाद' हा शब्द का आहे योग्य? मराठीचं व्याकरण नक्की काय सांगतं ?

मराठीची बाराखडी; 'आशीर्वाद' हा शब्द का आहे योग्य? मराठीचं व्याकरण नक्की काय सांगतं ?

  • मराठीची बाराखडी; आशीर्वाद हा शब्द का आहे योग्य?
  • मराठीचं व्याकरण नक्की काय सांगतं ?
तुम्ही कुठे बाहेर गेलात तर एखाद्या गाडीवर किंवा साधारणपणे दुकानाच्या पाटीवर नाहीतर घराच्या पाटीवर लिहिलेलं असतं 'आई तुझा आशीर्वाद', किंवा 'स्वामींचा आशीर्वाद' असं.
पण तुम्हाला माहितेय का मराठी व्याकरणानुसार 'आशीर्वाद' शब्द कसा लिहावा ते ? या शब्दाविषयी मराठी व्याकरणात काय सांगितलं आहे ते जाणून घेऊयात.

अनेकदा आशीर्वाद हा शब्द चुकीचा लिहिला जातो. खरंतर पाहायला गेलं तर अनेकजण आशिर्वाद असं लिहितात. पण मराठी व्याकरणात 'आशीर्वाद' असा शब्द योग्य असल्याचं म्हटलं जातं. व्याकराणानुसार 'आशीर्वाद' या शब्दातील 'श' हा ऱ्हस्व नसून तो दिर्घ असणं अपेक्षित आहे. 'आशीर्वाद' या शब्दावरचा रफार हा 'व' या अक्षरावर असायला पाहिजेत. तुम्ही जर 'श' वर रफार दिला तर त्याचा उच्चार बदलतो आणि अर्थ चुकीचा होतो. आशीष आणि वाद या दोन शब्दांच्या एकत्रिकरणाने आशीर्वाद असा शब्द तयार होतो.

मराठीची बाराखडी; 'च' आणि 'च' दोन्हीच्या उच्चारातला फरक आणि अर्थ काय ?

या मागचं नक्की व्याकरण काय ?

मराठी व्याकरणाचा रफार असं सांगतो की, ज्या अक्षरावर रफार असतो त्याच्या अक्षाराच्या आधी 'र' चा उच्चार होतो. कारण उच्चार करताना आशीर्वाद मधल्या वादच्या आधी 'र' चा उच्चार होतो. त्यामुळे व वरती रफार आणि श हा दिर्घ असतो. मराठी वळवावी तशी वळते. कधी कधी या भाषेचा चुकीच्या शब्दांमुळे अर्थाचा अनर्थ देखील होतो. त्यामुळे या भाषेची गंमत देखील तितकीच असते. आता राहता राहिला प्रश्न हा शुद्य किंवा अशुद्ध मराठीचा. तर भाषा ही शुद्ध किंवा अशुद्ध नसते तर योग्य किंवा अयोग्य या दोन गटात असते. मैलामैलांवर भाषा बदलते त्यामुळे जशी प्रमाण भाषा ही मराठी आहे तशीच बोलीभाषा देखील मराठीच आहे. फक्त ती लिहिताना बोलताना काही वेळेस चुकीच्या लिहिण्याने किंवा चुकीच्या उच्चाराने या भाषेतील वाक्याचा किंवा शब्दाचा अर्थ बदलतो.

तसंतर अमृताहूनी गोड असलेली ही भाषा ही म्हणजे फक्त मायबोलीच नाही तर या भाषेने संतांच्या अभंगवाणी, भारुड, पोवाडा आणि भावगीतं अशी विविध लोकगीतेची अंग जी माणसाला माणूस म्हणून समृद्ध करेल अशी दिली आहे. त्यामुळे भक्त सुरेश भटांच्या गाण्याचे बोल फक्त असून चालणार नाही तर ते मनात विचार भिनायला पाहिजेत.

Marathi Bhasha : मराठीची बाराखडी ; 'भेटणं' आणि 'मिळणं' यातील फरक काय ?

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी ऐकतो मराठी
जाणतो मराठी मानतो मरठी

फक्त बोलून नाही तर वाचून शिकून आणि योग्य रित्या लिहून मराठी पुढच्या पिढीत रुजवता येईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra