- नुकतीच पार पडली कॉमनवेल्थ गेम्स 2026 ची स्पर्धा
- भारताने जिंकली तब्बल 39 पदके
- पदक जिंकल्याबद्दल ज्ञानेश्वरी यादवचा होणार सन्मान
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी ज्ञानेश्वरी यादवचा विशेष सन्मान केला आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तिचे कौतुक केले आहे. तसेच मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी ज्ञानेश्वरी यादवला 30 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. तसेच पोलिस विभगात म्हणजेच सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. ज्ञानेश्वरी यादवला मुख्यमंत्र्यांनी डीएसपी पदावर पदोन्नती देण्याची घोषणा केली आहे.
छत्तीसगडच्या ज्ञानेश्वरी यादवने 53 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंग स्पर्धेत एकूण 119 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी ज्ञानेश्वरीचे अभिनंदन केले आहे. 'दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमाने कोणतेही ध्येय सध्या करता येते हे,' ज्ञानेश्वरीने दाखवून दिले आहे.
तिने मिळवलेले यश हे छत्तीसगडच्या इतिहासातील अत्यंत आनंदाचा क्षण आहे. तिचे यश तरुणांना आणि विशेषत: मुलींना प्रेरणा देइल. छत्तीसगड सरकार खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. राज्य सरकार त्यांना दर्जेदार प्रशिक्षण, उत्कृष्ट सुविधा आणि आवश्यक साधने पुरवत आहे.
IND Vs SL: कोणाचा बळी जाणार! Devdatt Padikkal की Sai Sudharsan? श्रीलंकेविरुद्ध कोण खेळणार?
ज्ञानेश्वरी यादव सध्या छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यात पोलीस विभागात 'सहायक उपनिरीक्षक' (ASI) म्हणून कार्यरत आहेत. राज्य सरकारच्या या घोषणेमुळे क्रीडा क्षेत्रातून आणि पोलीस प्रशासनातून ज्ञानेश्वरी यादववर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या यशाचे श्रेय वडिलांना देताना ज्ञानेश्वरी अत्यंत भावूक झाली. ती म्हणाली, 'माझे वडील स्वतः बॉडीबिल्डिंग करायचे. मी लहान असताना ते मला रोज सायकलवर बसवून जिममध्ये घेऊन जायचे. जे स्थान आणि यश त्यांना स्वतःच्या आयुष्यात मिळवता आले नाही, ते मी मिळवावे आणि देशाचे नाव जगात उंच करावे, हेच त्यांचे स्वप्न होते.' सामन्याच्या दिवशी ज्ञानेश्वरीला अत्यंत कठीण शारीरिक परिस्थितीचा सामना करावा लागला. ती म्हणाली, 'माझ्या सामन्याच्या दिवशीच माझ्या मासिक पाळीचा पहिला दिवस होता. पोटात अत्यंत तीव्र वेदना होत होत्या.'

